ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वनाधिकारी मुख्यालयी राहत नसल्याने शेतकरी अडचणीत

मुख्यालयी राहण्याची अनिल स्वामी यांची मागणी ; 'उभ्या पिकांवर डुक्कराचा हैदास,वन्य हिंस्त्र प्राण्यांच्या मुक्त संचार'

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. शेखर प्यारमवार

अलीकडेच रूजू झालेले वनपरिक्षेत्र अधिकारी आरोग्याच्या कारणावरून कित्येक दिवसांपासून रजेवर असून वन विभागातील स्थानिक कर्मचारीही मुख्यालयी राहत नसल्याने तालुक्यातील शेतकरी अडचणीत सापडले आहेत. वन्य प्राण्यांपासून त्रस्त असलेल्या शेतक-यांमध्ये वन कर्मचा-याविषयी असंतोष पसरला असल्याने या गंभीर प्रकाराकडे वरीष्ठांनी लक्ष न दिल्यास तिव्र आंदोलन करू. असा इशारा विविध सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष अनिल स्वामी यांनी दिला आहे.

चालू हंगामात तालुक्यातील शेतात धान पिक उभे असून येत्या काही दिवसात कापणीला सुरूवात होणार आहे. अश्या स्थितीत रान डुकर शेतात घुसून उभे पिक उध्दवस्त करीत असल्याने शेतक-यांचे प्रचंड नुकसान होत आहे. दुसरी कडे वाघ आणि बिबटयाचेही शेतक-यांना अधुन मधुन दर्शन होत असल्याने त्याचीही भिती शेतक-यांना आहे. वन्य प्राण्यांपासून शेत पिक उध्दवस्त झाल्यानंतर तलाठी, कृषी सहायक आणि वनरक्षक या तिघांपैकी कोणत्याही दोन कर्मचा-यांनी प्रत्यक्ष पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची शासनाची योजना आहे.

परंतू पंचनामे करण्याकरीता ज्या तिन कर्मचा-यांची नियुक्ती करण्यांत आलेली आहे हे तिनही कर्मचारी बहुतांशी मुख्यालयी राहत नसल्याने पंचनामे करण्यास दिरंगाई होत आहे. ज्या शेताचे पंचनामे करून नुकसानीची रक्कम मिळण्यासाठी प्रस्ताव सादर केल्या जाते ती रक्कम वन परिक्षेत्र अधिकारी आणि सहायक वनसंरक्षक आपआपल्या स्तरावर कमी करत असल्याने अत्यंत कमी मोबदला शेतक-यांना मंजुर होत असल्याने शासनाच्या या धोरणाविषयी शेतक-यांमध्यें प्रचंड नाराजी आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये