ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

६ कोटी चा रस्ता झाला ३ महिन्यात खड्डेमय

निकृष्ट दर्जाचे काम

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

गडचांदूर ते नांदाफाटा या रस्त्याच्या दुरुस्ती मजबुती व डांबरीकरणाच्या कामाकरिता सहा कोटी रुपये मंजूर झाले. तब्बल एका वर्षा नंतर रस्ता बांधकाम सुरू झाले तीन महिन्यापूर्वी रस्ता बनविण्यात आला. तीन महिने होत नाही तोच नांदा फाटा ते बिबी रस्त्यावरील डांबर उखडून जागो – जागी, रस्ता फुटला असून मोठ – मोठे, खड्डे पडल्याने रस्ता खड्डेमय झाल्याचे दिसून येत आहे.

निकृष्ट दर्जाचा कामाला बांधकाम विभागाचा आशीर्वाद

रस्त्यावरील खड्ड्याची सफाई करून त्यात ४० एम. एम.गिट्टी डांबराचे इमल्शन चुरी टाकून रोड रोलर ने प्रेसिंग केले जाते संपूर्ण रस्त्यावरील धूळ हवेच्या प्रेशरने उडविली जाते जुना रस्ता व नवीन डांबरीकरणाचा लेयरची घट्ट पकड होण्याकरिता डांबराचे विशेष इमल्शन गरम करून रस्त्यावर टाकल्यानंतरच नवीन डांबरीकरणाचा लेयर टाकावयाचा असतो तसेच रस्ता बनवीत असतांना सदर रस्ता वर पाणी साचू नये किंवा मधोमध खड्डा पडणार नाही याची काळजी घेतल्या जाते परंतू इथे तसे दिसून आले नाही. तरी देखील सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी निकृष्ट दर्जाचा रस्ता उत्कृष्ठ दाखवत अशाच रस्त्याला वाव देण्यात धन्यता मानत असल्याचे दिसून येत आहे.

नांदा फाटा ते बिबी गावा पर्यंत रस्त्यावर मोठ – मोठे खड्डे पडलेले आहे. तर कुठे गिट्टी उखडलेली दिसून येत आहे. खड्डे चुकविण्याचा नादात रोजच किरकोळ अपघात होत निदर्शनास येत आहे.

सदर कंत्राटदार यांचे कडून बिबी गावा लगत रस्त्याचा बाजूला मोठी नाली (ड्रेन) बांधकाम सुरू आहे. परंतू या नाली चे बांधकाम सरळ नसून वाकडे – तिकडे, खाल – उमाट अशा प्रकारे सुरू असून नालीवरील जुने रापट फोडले नसून तसेच काम केल्या जात असल्याचे निदर्शनास येत आहे.

बिबी पुलीया ते नांदा फाटा एक लेअर रस्त्याचे काम बाकी असल्याने रस्त्यात पडलेले खड्डे व लेअरचे काम कंत्राटदार यांचे कडून पूर्ण करून घेऊ असे- आकाश बाजारे (अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग गडचांदूर)यांनी सांगितले

नांदा फाटा ते बिबी सदर रस्ता बांधकाम करीत असताना काही होतकरू युवकांनी हाताने रस्तावरील डांबर निघत असल्याने रस्त्याचा निकृष्ट दर्जा सामोर आणला होता. आणि काही वेळा करिता रस्ता बंद पाडून सदर रस्त्याचा दर्जा सार्वजनिक बांधकाम विभाग अभियंत्याच्या निदर्शनास आणून दिले होते. हे विशेष

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये