गुन्हेग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कापासाचे बोगस बियाणे पॅकींग व लेबलींग करून वितरीत करणारे आरोपी पोलीसांच्या जाळ्यात

एकूण १ करोड ५५ लाख ८३ हजारावर माल जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे 

तक्रारदार तालूका कृषी अधिकारी, वर्धा श्री. सुभाष शामरावजी मुंडे, वय 54 वर्षे, रा. सुराना लेआऊट नालवाडी, यांनी पोलिसात तक्रार दाखल केली की, मोठ्या प्रमाणात कापासाचे बोगस बियाणे पॅकींग व लेबलींग करून वितरीत होत आहे. त्यावरुन पोलिसांनी घटनास्थळ अग्रगामी शाळेकडे जाणारा रोड, मौजा मसाळा, पो.स्टे. सेवाग्राम, ता.जि. वर्धा येथे दि. 12.6.2023 चे रात्री दरम्यान धाड टाकली असता आरोपी राजू जयस्वाल हा इतर आरोपीतांच्या सहाय्याने हे कापासाचे बोगस बियाणे पॅकींग व लेबलींग करून वितरीत करीत असतांना मिळून आला.

       त्याचेजवळ बोगस बियाणांसोबतच सीलींग पॅकिंग साहित्य, बियाणे निर्मीतीसाठी लागणारे साहित्य, वाहने व मोबाईल सुध्दा मिळून आले. आरोपी राजू सुभाश जयस्वाल, वय 38 वर्ष, रा. रेहकी, ता. सेलू, जि. वर्धा चे सांगणेप्रमाणे सदर कापसाचे बोगस बियाणे त्याने राजूभाई रा. ईडर, जि. अहमदाबाद (गूजरात) व महेंद्रभाई रा. दरामली अहमदाबाद (गुजरात) यांचेकडून 12.06.2023 रोजी प्रत्येकी 7 टन प्रमाणे एकूण 14 टन माल आणला असून, सिलींग व लेबलींगसाठी लागणारे कापसाच्या बियाणांचे पॅकेट उपरोक्त नमूद प्रमाणे आरोपी गजू बोरकर, विजय बोरकर, प्रविण, वैभव भोंगे, हिना किराणा, पंकज जगताप, गजभिये व शुभम बेद यांनी दिल्याचे सांगीतले आहे. आरोपी राजू जयस्वाल व गुजरात येथील पूरवठा करणारे आरोपी यांची देवाणघेवाण गजू ठाकरे रा. कारला रोड वर्धा यांचे मार्फत झाल्याचे व त्याकरीता गजू ठाकरे याने 3,50,000/-रू कमीषन स्वरूपात घेतल्याचे निश्पन्न झाले आहे.

     आरोपी राजू सुभाश जयस्वाल, वय 38 वर्शे, रा. रेहकी, ता. सेलू, जि. वर्धा, धरमसिंग यादव वय 27 वर्शे, रा. जौनपूर उत्तर प्रदेष, राजकूमार वडमे वय 39 वर्शे, रा. रेहकी ता. सुलू जि. वर्धा, हरीष्चंद्र उईके वय १८ वर्षे, रा. राडोंगरी जि. छिंदवाडा मध्य प्रदेष, अमन धूर्वे वय १८ वर्शे, रा. लास जि. छिंदवाडा, मध्य प्रदेष, सुदामा सोमकूवर वय 27 वर्षे, रा. लास जि. छिंदवाडा, मध्य प्रदेश, गजू बोरकर, रा. सेलू, विजय बोरकर, रा. हमदापूर 9) प्रविण रा. वरोरा, चंद्रपूर, वैभव भोंग्र, रा. अमरावती, हिना किराणाचे मालक यवतमाळ, पंकज जगताप, अमरावती, गजभिये (क्रिस्टल कंपनी नागपूर), गजू ठाकरे, रा. कारला रोड, शुभम बेद, रा. वर्धा यास अटक झाली असून अपराध क्रमांक:- /2023 कलम:- 420, 468, 469, 471, 120(ब) भादवि, सहकलम 7(सी), 6(बी), 7(ए), 61 बियाणे अधिनियम 1966, सहकलम 7, 8 बियाणे अधिनियम 1968, सहकलम 3 व 9, 8(अ) खंड बियाणे नियंत्रण आदेष 1983, सहकलम 15 पर्यावरण अधिनियम 1986, सहकलम 3, 2(ड) 1 जिवनावष्यक वस्तू कायदा 1955, कलम 12(ग) कापूस बियाणे नियम 2009, सहकलम 6, 8, 9 पर्यावरण संरक्षक नियम 1989, सहकलम 63 कॉपरीराईट अधिनियम 1957 अन्वये गुन्हा नोंद झाला आहे. तसेच झालेल्या कारवाईत एकूण जू.कि. 1 करोड 55 लाख 83 हजार 970 रू माल जप्त केला आहे.

सदरची कारवाई नुरूल हसन, पोलीस अधिक्षक, वर्धा, अपर पोलीस अधिक्षक डॉ. सागर कवडे, पोलीस निरीक्षक स्थागूषा संजय गायकवाड, पो.नि. पो.स्टे. सेवाग्राम जळक यांचे प्रत्यक्ष हजेरीत व मार्गदर्षनात स.पो.नि. संदीप कापडे, पो.उप.नि. अमोल लगड यांचेसह पो.स्टे. सेवाग्राम, स्थागूषा, व सी.आय.यू. चे कर्मचारी यांनी केली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये