ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांनी भरपावसात साधला नागरिकांशी संवाद

चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या जनसंपर्क यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद

चांदा ब्लास्ट

 शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने मंगळवारी ५ सप्टेंबरला तुकुम परिसरात जनसंपर्क यात्रा काढण्यात आली. या यात्रेत प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले सहभागी झाले होते. यावेळी नानाभाऊंनी परिसरातील जनतेशी संवाद त्यांच्या भावना समजून घेतल्या. भरपावसात निघालेल्या या यात्रेला जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

देशातील जनतेला खोटी आश्वासने देऊन सत्तेत आलेल्या मोदी सरकारने संविधानानुसार शासन न करता मनमर्जीनुसार सुरू केला आहे. मागील ९ वर्षांत देशाची सर्वच क्षेत्रात अधोगती झाली आहे. महागाईने उच्चांक गाठला आहे. धार्मिक तेढ निर्माण करण्याचा वारंवार प्रयत्न केला जात आहे. जातीय दंगली घडवल्या जात आहेत. महिलांची विवस्त्र धिंड काढली जात असताना पंतप्रधान गप्प आहेत. राज्यात बेईमानी आणि ५० खोक्यातून तयार झालेल्या राज्य शासनाला जनतेशी काहीही देणेघेणे नाही. त्यामुळे शेतकरी, कामगार, तरुण, महिलांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. शेतकऱ्यांची क्रुर थट्टा चालविली जात आहे. नोकरभरतीच्या नावावर बेरोजगार तरुणांकडून लूट सुरू आहे. शेतकऱ्यांना १२ तास वीजपुरवठा करण्याचे आश्वासन देणाऱ्या सत्ताधाऱ्यांच्या काळात ८ तास वीजही मिळत नाही. वीजेचे दर वाढवून जनतेची लूट केली जात आहे. सरकारी संस्था विकण्याचा घाट घातला जात आहे. ओबीसींची जनगणना करण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.

त्यामुळे केंद्र सरकार आणि राज्य शासनाचा नाकर्तेपणा जनतेसमोर आणून जनतेचे प्रश्न समजून घेण्यासाठी या जनसंवाद यात्रेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती नानाभाऊंनी सेवादलाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात दिली. यावेळी सेवा दलाच्या वतीने ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर यात्रेला सुरवात झाली. तुकुम परिसरातील नागरिकांशी यावेळी संवाद साधण्यात आला. त्यानंतर परिसरातील मंदिर, मशिद, चर्च आणि गुरुद्वारा येथे भेट देण्यात आली. यासोबतच शहरातील काही प्रतिष्ठित नागरिकांच्या घरीसुद्धा नानाभाऊंनी भेटी दिल्या. सायंकाळी कस्तुरबा चौक ते दादमहल प्रभाग अशी जनसंवाद यात्रा काढण्यात आली. त्यानंतर गांधी चौकात जाहीर सभा पार पडली.

यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार सुभाषभाऊ धोटे, आमदार प्रतिभाताई धानोरकर, आमदार सुधाकर अडबाले, प्रदेश उपाध्यक्ष नाना गावंडे, जिल्ह्याचे निरीक्षक मजीब पठाण, चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष रितेश (रामू) तिवारी, महिला काँग्रेसच्या शहर जिल्हाध्यक्ष चंदाताई वैरागडे, माजी जिल्हाध्यक्ष सुनीता अग्रवाल, ग्रामीण जिल्हाध्यक्ष नम्रता ठेमस्कर, ज्येष्ठ नेते के. के. सिंग, माजी जिल्हाध्यक्ष विनायक बांगडे, माजी जिल्हाध्यक्ष सुभाष गौर, प्रदेश महासचिव विनोद दत्तात्रय, सेवादलचे जिल्हाध्यक्ष सूर्यकांत खनके, कृउबासचे माजी सभापती दिनेश चोखारे, संदीप गड्डमवार, अनिल शिंदे, माजी महापौर संगीता अमृतकर, युवक काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष राजेश अडूर, ओबीसी विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष राहुल चौधरी, ओबीसी विभागाचे प्रदेश पदाधिकारी प्राचार्य नरेंद्र बोबडे, अश्विनी खोबरागडे, निशा धोंगडे, किसान सेलचे शहर जिल्हाध्यक्ष भालचंद्र दानव, ओबीसी विभागाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रशांत दानव, संतोष लहामगे, सुनीता लोढिया, नंदू नागरकर, प्रविण पडवेकर, मनीष तिवारी, गोपाल अमृतकर, प्रसन्ना शिरवार, महेश मेंढे, सचिन कत्याल, नासीर शेख, पितांबर कश्यप, राजेश रेवल्लीवार, विना खनके, कुणाल चहारे, पप्पू सिद्दीकी, रवी भिसे, मतीन कुरेशी, उमाकांत धांडे, संदीप सिडाम, एनएसयुआय जिल्हाध्यक्ष शफाक शेख, सकिना अन्सारी, वंदना भागवत, विजय धोबे, सुनंदा धोबे, मुन्नी बाजी, सुभाष जुनघरे, रुचित दवे, गौस खान, तवंगर खान, संगीता भोयर, अनुताई दहेगावकर, शालिनी भगत, राजू खजांची, गुंजन येरमे, यश दत्तात्रय, काशील अली, सागर खोब्रागडे, रामक्रिष्ण कोंड्रा, राजू वासेकर, मोनू रामटेके, प्रदीप डे, मनोरंजन राय, रोशन पचारे, पवन आगदारी, अस्लम शेख, युवराज कुडे, गणपत कुडे, विजय पोहनकर, रतन शीलावार, वहाव काझी, दिनेश शेडमाके, दौलत चालखुरे, ललिता रेवल्लीवार, युसूफ चाचा, शाबिर सिद्दीकी, ताजुद्दीन शेख, ताजुभाई, अलनालमामू, सलिम शेख, राजेश वर्मा, सुलतान, इश्लान भाई, एजाज कुरेशी यांच्यासह काँग्रेसच्या सर्व फ्रंटल आर्गनायझेशनचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मनपा निवडणुकीत काँग्रेसला साथ द्या : नानाभाऊ पटोले

चंद्रपूर महानगरपालिकेवर भारतीय जनता पक्षाची सत्ता होती. या सत्ताधाऱ्यांनी विकासाकडे दुर्लक्ष केले. केवळ भ्रष्टाचार करण्यातच त्यांचा कार्यकाळ गेला. अमृत योजनेचे अजुनही येथील नागरिकांना पिण्याचे पाणी मिळालेले नाही. योजनेच्या नावावर रस्ते खोदून ठेवले आहेत. चंद्रपूरकर जनता अनेक समस्यांनी त्रस्त आहे. मात्र, सुविधा न देता करवाढ येथील नागरिकांवर लादण्यात आली आहे. त्यामुळे आगामी काळात होऊ घातलेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षा सत्ता आणण्यासाठी काँग्रेस पक्षाला साथ देण्याचे आवाहन प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी गांधी चौकात पार पडलेल्या जाहीर सभेतून केले. यावेळी त्यांनी केंद्र सरकार, राज्य शासनाच्या धोरणावरही टीका केली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये