ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

चंद़पूर लोकसभा कॉग्रेस अंतर्गत “कॉन्फयुज्ड” झालेल्यांची संख्या मोठी – महेश पानसे

चांदा ब्लास्ट

लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहेच. अधिकृत घोषणा झाली नसली तरी ना.सुधिरभाऊ मुनगंटीवार भा.ज.पा.चे चंद्रपूर लोकसभा क्षेत्राचे उमेदवार असल्याचे जवळपास निश्चित समजले जाते. मात्र या लोकसभा क्षेत्राचे उमेदवारीवरून कांग्रेस गोटात ‘कन्फयुजन’ कायम आहे. उमेदवारी मागण्याचा अधिकार साऱ्यांना असला तरी वैयक्तीक महत्वाकांक्षेपेक्षा पक्षहित लक्षात घेऊन अधिकुत उमेदवाराच्या पाठीशी एकदिलाने उभे राहून टक्कर देण्याची अपेक्षा ठेवणारे पक्ष कार्यकर्ते मात्र ‘कॉन्फयुज्ड’ झाल्याचे चित्र दिसत आहे.

आ. प्रतिभा धानोरकर व काँग्रेस कमेटी पदाधिकारी तथा विरोधी पक्षनेते विजयभाऊ वडेट्टीवार यांची कन्या शिवानी वडेट्टीवार यांनी उमेदवारी करीता फिल्डींग लावली आहे.याशिवाय कांग्रेस जिल्हाध्यक्ष आ.धोटे यांचेही नाव दिल्लीच्या बैठकीत पुढे सरकविण्यात आल्याच्या वृत्ताने अजून कॉन्फयुजन वाढलेले दिसत आहे. पक्षश्रेष्टी जो आदेश देतील त्यानुसार काम करण्याची बतावणी सारे करीत असले तरी प्रत्यक्ष निवडणुकीत सर्व अलबेल राहिलच याबाबत उलटसुलट चर्चा मात्र सुरु आहे.

चंद़पूर- आणीं लोकसभा क्षेत्रात कडवी झुंज यंदाही अपेक्षेनुसार भा.ज.पा.व भारतीय राष्ट्रीय कांग्रेस मध्येच होणार हे निश्चित आहे. हे जरी खरे असले तरी निवडणूकीत ना.सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या सारख्या विरोधी उमेदवारास आव्हान देण्यात नेत्यांची वैयक्तीक महत्वाकांक्षा अडसर तर ठरणार नाही ना अशी भिती कांग्रेस प्रेमींना असल्यास नवल नसावे. गत लोकसभा निवडणुकीत सकल महाराष्ट्रात या क्षेत्रातून कांग्रेसचे ऐकमेव उमेदवार स्व.सुरेश धानोरकर निवडून आले होते व कांग्रेसविरहीत राज्याचा नारा देणाऱ्या भा.ज.पा.ला या क्षेत्रातील मतदारांनी रोखले होते हे विशेष.

स्व.धानोरकर निवडून येण्यामागे अनेक कारणे असली तरी एरव्ही पकडापकडी करणारी जिल्यातील कांग्रेसची नेतेमंडळी एकत्रीत येऊन कामाला लागली होती हेही एक कारण होते. स्व.धानोरकरांच्या उमेदवारीपासून तर विजयश्री ओढुन आणेपर्यन्त विदयमान विरोधी पक्ष नेते ना.विजय वडेट्टीवार पुढे होते.

शिवानी वडेट्टीवार यांनी स्व.धानोरकरांच्या पत्नी आ.प्रतिभा धानोरकर यांच्या विरोधात उमेदवारीसाठी आव्हान उभे केल्याने कुठेतरी आता हा दोन्ही गटासाठी व्ययक्तिक महत्वाकांक्षा व प्रतिष्टेचा विषय झाल्यास गत निवडणूकीत धानोरकर- वडेट्टीवार जोडीने राखलेला चंद्रपूर लोकसभेचा किल्ला साबूत ठेवणे शक्य होईल का? यावर गप्पा झडताना दिसत आहेत.

हयात असते तर स्व.धानोरकरांची उमेदवारी ही येत्या लोकसभा निवडणुकीत त्यांना निश्चित होती हे वेगळे सांगायला नको. मात्र, आता धानोरकरांच्या स्वर्गवासानंतर चंद्रपूर लोकसभा क्षेत्रावर राजकिय महत्वकांक्षा जपणाऱ्या दबंग नेत्यांची कांग्रेस अंतर्गत उमेदवारीसाठी दावेदारी वाढल्याचे चित्र बघायला मिळत आहे.

आ.सुभाष धोटे यांच्या चंद्रपूर लोकसभा उमेदवारीचा पिल्लू मधात सुटल्याने आ.प्रतिभा धानोरकर यांची दावेदारी कमजोर करण्याचा डाव असल्याचे राजकिय जाणकारांचे मत आहे. कांग्रेस उमेदवारीची दावेदारी    ज्येष्ठ, दबंग नेते विजय वडेट्टीवार यांनी स्वतासाठी न करता आ.प्रतिभा धानोरकर यांचेशिवाय इतरांच्या उमेदवारीसाठी घोडा रेटल्याने पुढे निवडणुकीत गटबाची होऊन विरोधी भा.ज.पा.उमेदवारास याचा मोठा फायदा होईल या भिंतीने पक्षप्रेमी काँग्रेसजन अधिक ‘कॉन्फयुज्ड’ झालेले दिसत आहेत.

       नैतिकतेच्या व कांग्रेस परंपरेच्या आधारावर स्व. सुरेश धानोरकरांच्या पत्नी व कांग्रेसच्या विदयमान आमदार प्रतिभा धानोरकर यांनी आपल्या उमेदवारीची मागणी केली आहे.तर शिवाणी वडेट्टीवार यांनी पक्ष पदाधिकारी या नात्याने केलेल्या उमेदवारीच्या दावेदारीचे गणीत अधिक “कॉन्फयुज्ड” करणारे असल्याचे बोलल्या जाते.

 चंद्रपूर लोकसभेकरीता आ. प्रतिभाताई धानोरकर यांनी दावेदारी स्वाभाविक व क्रमप्राप्त असली तरी भारी राजकिय महत्वाकांक्षा बाळगणारे वजनदार नेते विजयभाऊ वडेट्टीवार इतक्या सहजपणे पक्षाची लोकसभेची उमेदवारी सहजासहजी आपल्या कंपूतून जाऊ देणार नाहीत असे जाणकारांना वाटते.

      तसेही गत तिन वर्षांचे काळात कोण भारी ? यावर स्व. धानोरकर व विजयभाऊ वडेट्टीवार यांच्यात घमासान सुरु होते हे संपुर्ण विदभं जाणतो.

      अशा वेळी ट्रायल म्हणून शिवानी वडेट्टीवार यांना पुढे करण्यात येऊ शकते.

       आ. प्रतिभा धानोरकर गत ५ वर्षात लोकप्रतिनिधी म्हणून बऱ्यापैकी यशस्वी झालेल्या आहेत. स्व.धानोरकरांच्या निधनानंतर ज्या आत्मविश्वासाने आ. प्रतिभाताई यांनी आपले स्थान कायम केले ते बघता व चंद्रपूर लोकसभा क्षेत्रात पक्षाचे भविष्य बघता त्यांचे नावाचा किती विचार होतो हे लवकरच कळेल.

           कांग्रेस पक्षाचे लोकसभा उमेदवारी वडेट्टीवार गटाला किंवा आ.धानोरकरांना मिळेल मात्र पक्षहितासाठी एकत्रपणे काम झाले तरच पक्षाचे भले होईल ही प्रामाणिक कार्यकर्त्याची भावना दिसते. उमेदवारी वरून लोकसभा क्षेत्रात पक्षात फुट पडली तर मात्र हातातील क्षेत्र सहजपणे विरोधकांकडे जाण्याच्या अ चंद्रपूर लोकसभा कांग्रेसविरहीत होण्याच्या चिंतेने “कन्फयुजन” वाढलेल्यांची संख्या क्षेत्रात फार मोठी दिसते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये