ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

देशी-विदेशी व मोहा दारूची विक्री करणाऱ्या आरोपीतांवर धडक कार्यवाही

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

 स्थानिक गुन्हे शाखा जिल्हा वर्धा चे पुलगाव पथक यांनी देशी-विदेशी व मोहा दारूची विक्री करणा-या आरोपीतांवर धडक कार्यवाही करीत मौजा वायगाव (नि.) ते कापसी रोडवर असलेल्या हॉटेल वेलकम येथे प्रो.रेड केला असता, हॉटेलमध्ये विदेशी दारूने भरलेल्या ऑफिसर चॉईस कंपनीच्या 30 शिशा कि. 10,500 रू, रॉयल चॅलेज कंपनीच्या 35 शिशा कि. 12,250 रू, रॉयल स्टॅग कंपनीच्या 29 शिशा कि. 10,150 रू व एक हिरो प्लेझर मोपेड क्र. एम.एच.32 एस.8393 कि. 50,000 रू असा जु.किं. 82,900 रू चा माल हॉटेल मालक समद खान सोहेल खान पठान रा. वायगाव (नि.) याचे ताब्यातून जप्त करून, सदर दारूचा माल पुरवठा करणारा किरण कामडी रा. वायगाव (नि.) यांचेवर पो.स्टे. देवळी येथे दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा नोंद केला..

  तसेच मौजा नांदोरा (ड) षेत षिवारातील आरोपीचे झोपडीमध्ये दारूबंदीबाबत प्रो.रेड केला असता, तेथे देशी दारूने भरलेल्या 72 शिशा कि. 10,800 रू व एका डबकीमध्ये 20 ली गावठी मोहा दारू डबकीसह कि. 3,100 रू असा जु.कि. 13,900 रू चा माल मिळून आल्याने आरोपी अमोल सुनील तुरणकर रा. देवळी व अभिलाश डफरे रा. नांदोरा (ड) यांचेवर पो.स्टे. देवळी येथे गुन्हा नोंद केला.

  अशा प्रकारे विविध कार्यवाहीमध्ये देशी दारूच्या 72 शिशा कि. 10,800 रू, विदेशी दारूच्या 94 शिशा कि. 32,900 रू, 20 ली. गावठी मोहा दारू 3,000 रू व एक मोपेडसह जु.कि. 96,800 रू चा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

  सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक मा. नुरूल हसन सा., अपर पोलीस अधिक्षक मा. डॉ सागर कवडे सा., यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा जि. वर्धा चे पोलीस निरीक्षक मा.संजय गायकवाड सा. यांचे निर्देशाप्रमाणे, मनोज धात्रक, अरविंद येनुरकर, संजय बोगा, विनोद कापसे, अभिषेक नाईक यांनी केली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये