ताज्या घडामोडी

चंद्रपूर शहरातील बायपास रस्ता तातडीने करा : दिनेश चोखारे

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन

चांदा ब्लास्ट —
चंद्रपूर (प्रतिनिधी)
चंद्रपूर हे एक प्रमुख औद्योगिक शहर आहे. शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. यामुळे शहरातील वाहतूक व्यवस्था कोलमडून पडली आहे. शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी बायपास काढण्याचा प्रस्ताव मंजूर झाला होता.

परंतु, प्रकल्प अद्यापही प्रलंबित आहे. बायपास रस्ता झाल्यास शहरातील वाहतूक कोंडी कमी होणार होती. हा प्रश्न निकाली काढण्यात यावा. या मागणीसाठी भूमिपुत्र संघटनेचे संयोजक दिनेश दादापाटील चोखारे यांच्या नेतृत्वाखाली 1 डिसेंबर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले.
चंद्रपूर शहराच्या मध्यभागातून राष्ट्रीय महामार्ग जातो. या महामार्गावरून दररोज हजारो वाहने ये-जा करतात. यामुळे शहराच्या मध्यभागी वाहतूक कोंडी होत असते. या कोंडीमुळे वाहनचालकांना अनेक तास थांबावे लागतात. यामुळे नागरिकांना आर्थिक आणि मानसिक त्रास होत आहे. जडवाहतूक शहरातून होत असल्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे त्यामुळे अनेकांचा जीव सुद्धा गमावला गेला आहे. अनेकांना दुखापत सुद्धा झाली आहे. ही रहदारी बायपास मार्गे झाल्यास शहरातून वाहतूक करताना इतरांना अडचण जाणार नाही. चंद्रपूर शहराच्या बाहेरून बायपास काढण्याचा प्रस्ताव मंजूर झाला होता. परंतु, अद्यापही या प्रकल्पाची अंमलबजावणी सुरू झालेली नाही. बायपास रस्ता झाल्यास शहरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल. यामुळे नागरिकांना वाहतूक कोंडीचा त्रास होणार नाही. तसेच, शहराची वाहतूक व्यवस्था सुव्यवस्थित होईल. चंद्रपूर शहराच्या बायपास प्रकल्पाची तातडीने अंमलबजावणी करण्यासंदर्भात आवश्यक निर्देश द्यावेत, अशी मागणी या धरणे आंदोलनातून करण्यात आली. या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत मुख्यमंत्र्यांना देण्यात आले.
यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती विजय बल्की, बाजार समितीचे संचालक अजय बलकी, पंचायत समिती चे माजी सभापती रोशन पाचारे, ओबिसी नेते सचिन राजुरकर, बल्लारपूर तालुका अध्यक्ष गोविंदा उपरे, हासिम कासिम खान, साखरवाहीचे सरपच नागेश बोंडे,सुरज तोतडे सरपंच ,पांढरकवडा, प्रेमानंद जोगी, आदिवासी नेते कृष्णाजी मासराम, पंचायत समिती माजी उपसभापती मनोज आत्राम,पांढरकवडा सरपंच सुरज तोतडे, बाजार समितीचे संचालक गणेश आवारी, पवन अगदारी, भटालीचे सरपंच किसन उपरे,माजी उपसरपंच संजय टिपले , रंगराव पवार, धंनजय राजुरकर, राहुल शेंडे, ईश्वर आखरे, हितेश लोंढे, गोविंदा बल्की, साचीन शेरकी, रोशन रामटेके, विवेक खुटेमाटे, नंदू टाँगे, जगन्नाथ चटप, जावेद कुरेशी, राजू कांबळे, निळकंठराव बल्की, सिद्धार्थ कवाडे, लक्ष्मण मांढरे, अझहर खान, आदिसह शेकडो भूमिपुत्र उपस्थीत होते.धरणे आंदोलनात बोलताना दिनेश दादापाटील चोखारे म्हणाले, “चंद्रपूर शहरातील वाहतूक कोंडी हा एक गंभीर प्रश्न आहे. या प्रश्नाचे तातडीने निराकरण करणे आवश्यक आहे. बायपास रस्ता झाल्यास हा प्रश्न निकाली लागेल. त्यामुळे बायपास प्रकल्पाची तातडीने अंमलबजावणी करावी. अशी मागणी करत मागण्या पुर्ण न झाल्यास 15 जानेवारी 2024 रोजी उपोषण करण्याचा इशारा यावेळी दिला आहे.
यावेळी उपस्थित नेत्यांनीही बायपास प्रकल्पाची तातडीने अंमलबजावणी करण्याची मागणी केली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये