ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

श्री स्वामी समर्थ मंदिर पावेतोच्या सिमेंट रस्त्याचे लोकार्पण

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

भगवान बाबा नगर येथील श्री स्वामी समर्थ मंदिर ते राष्ट्र संत प्लाझा पावेतो नगर परिषद च्या वतीने करण्यात आलेल्या सिमेंट रोड चे लोकार्पण आमदार डॉ राजेंद्र शिंगणे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले,कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी खासदार प्रतापराव जाधव होते,तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार डॉ शशिकांत खेडेकर,तोताराम कायंदे,माजी नगर परिषद अध्यक्ष तुकारामजी खांडेभराड,मुख्याधिकारी अरुण मोकळ होते.

स्वामी समर्थ सेवा केंद्र च्या वतीने सर्व अतिथींचा शाल,श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.

स्वामी समर्थ सेवा केंद्र पावेतो सिमेंट रस्ता तयार केल्याबद्दल नगर परिषद चे आभार मानले, या रस्त्यासाठी माजी नगर परिषद सदस्य सौ सुनीता सवडे, व गणेश सवडे यांनी सातत्याने पाठपुरावा केला,सिमेंट रस्त्यामुळे भाविकांची होणारी गैरसोय दूर झाली आहे.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवानंद मांटे यांनी केले,याप्रसंगी केंद्राचे सदस्य गजानन डोईफोडे, विजय तोडरमल, विजय मांटे, राजे संजय जाधव,पुजारी गाडेकर काका,महिला सेवेकरी,नगर परिषद चे अधिकारी, पदाधिकारी, तथा नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये