ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पचमढी मॅरेथॉन स्पर्धेत रोटरी क्लब ऑफ चंद्रपूरचे यश

मध्यप्रदेश सरकारच्या वतीने आयोजित

चांदा ब्लास्ट

मध्य प्रदेश सरकारच्या पर्यटन विभागाच्या वतीने पचमढी येथे आयोजित मॅरेथॉन स्पर्धे मध्ये रोटरी क्लब ऑफ चंद्रपूरचे सदस्य उत्तम डाखरे यांनी २१ किलोमीटरची मॅरेथॉन स्पर्धा विक्रमी वेळात पार केली. तसेच रोटरी क्लब चंद्रपूरच्या इतर सदस्यांनी ५ किलोमीटर मॅरेथॉन स्पर्धेत सहभाग नोंदवून स्पर्धा यशस्वी केली.

मध्यप्रदेश सरकारच्या वतीने ही मॅरेथॉन स्पर्धा पचमढीच्या दऱ्याखोऱ्यांच्या रस्त्यांवर आयोजित केली होती. या स्पर्धेत रोटरी क्लब ऑफ चंद्रपूर तथा सहकारी अशा एकूण १७ सदस्यांनी सहभाग घेतला होता. यामध्ये रोटरी क्लब ऑफ चंद्रपूरचे स्पर्धक उत्तम डाखरे यांनी २१ किलोमीटरच्या स्पर्धेत सहभाग नोंदविला होता. विशेष म्हणजे उत्तम डाखरे यांनी २१ किलोमीटरचे अंतर विक्रमी वेळेत पार केले. यासाठी डाखरे यांना आयोजकांनी पदक देवून सन्मानीत केले. त्याच बरोबर ५ किलोमीटरच्या मॅरेथॉन स्पर्धेत रोटरी क्लब ऑफ चंद्रपूरचे अध्यक्ष अनुप यादव, सहसचिव मिलिंद बोडखे, मनिष बोराडे, राजेश गण्यारपवार, सुरज वाघ, अमोल धकाते, संदिप रामटेके, अविनाश रघुसे यांच्यासह इतरही सदस्य सहभागी झाले होते. पाच किलोमीटर मॅरेथॉन स्पर्धेत यश मिळविल्याबद्दल स्पर्धेत सहभागी सर्व सदस्यांचा मेडल देवून सन्मान करण्यात आला. मनीष बोराडे व उत्तम डाखरे यांनी प्रकल्प संचालक म्हणून काम पाहिले. विशेष म्हणजे या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी सर्व सदस्य मागील एक महिन्यापासून सराव करित होते. पचमढी मॅरेथॉन प्रकल्प पूर्णत: यशस्वी करून दाखविल्याबद्दल सर्वांचे आभार आणि आयोजकांनी उत्तम व्यवस्थेसह पर्यटनाचा आनंद लुटला. स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व सदस्यांना प्रमाणपत्र व मेडल देवून सन्मानीत करण्यात आल्याची माहिती प्रकल्प संचालक मनिष बोराडे यांनी दिली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये