ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सिंदखेडराजा विधानसभा क्षेत्रात स्थिर सर्वेक्षण पथकाची स्थापना

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

 लोकसभा निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवर बुलढाणा लोकसभा मतदारसंघातील सिंदखेडराजा विधानसभा क्षेत्रामध्ये निवडणुकीसाठी नियोजनबद्ध तयारी चालू आहे, मा. सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे यांच्या आदेशानुसार स्थिर सर्वेक्षण पथकाची (SST) स्थापना करण्यात आली.

तसेच मा. तहसीलदार सिंदखेडराजा श्री. सचिन जैस्वाल, मा. तहसीलदार देऊळगावराजा वैशाली डोंगरजाळ मॅडम, नायब तहसीलदार सिंदखेड राजा श्री. मनोज सातव, नायब तहसीलदार देऊळगावराजा अस्मा मुजावर मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली हे पथक काम करणार आहे, या पथकावर नोडल अधिकारी म्हणून डॉ. श्रीकृष्ण वेणीकर, गट विकास अधिकारी (BDO) पंचायत समिती सिंदखेड राजा यांची नियुक्ती केली आहे.

लोकसभा निवडणुकीदरम्यान उमेदवार आणि राजकीय पक्षांचा निवडणूक खर्च व निवडणुकीतील गैरप्रकारांवर लक्ष ठेवण्यासाठी स्थिर सर्वेक्षण पथक (SST) काम करत असते, सिंदखेडराजा हे बुलढाणा जिल्हा लोकसभा मतदारसंघाचे शेवटचे टोक असून येथून मराठवाड्यातील जालना जिल्हा सुरू होतो. जालना तसेच छत्रपती संभाजीनगरहून येणाऱ्या गाड्यांची तपासणी करण्यासाठी या पथकांची स्थापना करण्यात आली आहे.

आज दिनांक 4 एप्रिल 2024 रोजी सिंदखेडराजा येथील बोराखेडी बावरा समृद्धी महामार्ग एक्झिट पॉईंट तसेच दुसर बीड येथील नागपूर समृद्धी महामार्ग एक्झिट पॉईंट येथील पथकाची पाहणी करून त्यांना मार्गदर्शक सूचना आज श्री. वेणीकर यांनी केली.

 दुसर बीड येथील समृद्धी महामार्ग एक्झिट पॉईंट वर श्री. एच. वाय. देशपांडे, श्री. एम. यू. थोरवे, फोटोग्राफर गणेश काटकर, कॉन्स्टेबल राठोड हे कर्मचारी येथील उपस्थित होते. सिंदखेडराजा येथील बोराखेडी 12 एक्झिट पॉईंट वर श्री. अनिकेत राठी, श्री. राहुल खेडेकर, श्री. उदय खराते इत्यादी कर्मचारी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये