ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
अंभोरा व निमखेड येथे महसुल विभागाने राबविला 100 दिवस कार्यक्रम

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा.अशोक डोईफोडे
ग्राम महसूल दिनानिमित्त मौजा अंभोरा व निमखेड येथे 9. एप्रिल रोजी महसूल दिनाचा कार्यक्रम घेण्यात शासनाच्या विविध योजनांबाबत मार्गदर्शन करण्यात आले व विविध दाखल्यांचे वितरण करण्यात आले सदर कार्यक्रम शासनाच्या 100दिवस कार्यक्रमांतर्गत उपविभागीय अधिकारी सिंदखेड राजा प्रा संजय खडसे व तहसीलदार देऊळगाव वैशाली डोंगरजाळ यांच्या मार्गदर्शनात मंडळ अधिकारी आर एम माटे,ग्राम महसूल अधिकारी सरिता वाघ, आकाश खरात यांनी आयोजित केला सदर कार्यक्रमासाठी गावातील नागरिक मोठ्या संख्यने हजर होते.
निमखेड येथे अडवलेल्या रस्त्याचा वाद मिटवून रस्त्यांचे काम सूरू करण्यात आले, यप्रसंगी दोन्ही बाजूकडील शेतकरी व गावांतील प्रतिष्ठित नागरिक उपस्थीत होते.