ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

एफ ई एस गर्ल्स महाविद्यालयात वृक्षरक्षाबंधन कार्यक्रम संपन्न 

चांदा ब्लास्ट

फिमेल एज्युकेशन सोसायटी चंद्रपुर व्दारा संचालित एफ ई एस गर्ल्स कॉलेज चंद्रपुर येथील रासेयो विभागाव्दारा रक्षाबंधन या दिवसाचे औचित्य साधून महाविद्यालयातील वृक्षाला रासेयो स्वयंसेविका यानी स्वता:राखी बनवून वृक्षाला राखी बांधली

प्र प्राचार्य डॉ. मिनाक्षी ठोंबरे यानी रक्षाबंधनाचे महत्व सांगुन व वृक्षाचे संवर्धन करणे असे विचार व्यक्त केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सह रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. प्रज्ञा जुनघरे यांनी केले तर आभार रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. राजेंद्र बारसागडे यानी मानले

सदर कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्रा. डॉ मिनाक्षी जुमले, डॉ सुवर्णा कायरकर, डॉ कल्पना कावळे,प्रा. डॉ. प्रमोद रेवतकर, प्रा. अशोक बनसोड,प्रा. डॉ. राजेश चिमनकर,प्रा. योगेश निमगडे,प्रा. लोकेश दरवे,प्रा शंकर पुरडकर,प्रा स्वाती कंनगोढीवारप्रा चंद्रकांत धाडेआणी निवडक रासेयो स्वयसेविका कार्यक्रमाला उपस्थित होते

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये