ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सर्प मित्रांनी दिले एका मोठ्या अजगर सापाला जीवनदान

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

शहरातील गौतम नगर येथे जूनघरे यांच्या शेतात काम करीत असलेल्या महिलांना सकाळी 10.00 वाजताच्या सुमारास एक मोठा साप शेतात आढळल्या ने सर्वत्र खळबळ उडाली. त्यांनी लगेच नैसर्गिक पर्यावरण व मानवता विकास संस्थे चे विभाग उपाध्यक्ष सर्पमित्र श्रीपाद बाकरे यांना माहिती दिली.

माहिती मिळताच घटनास्थळी सर्पमित्र श्रीपाद बाकरे, अनुप येरणे, शैलेश पारेकर, गोलू देरकर दाखल झाले. त्यांनी त्या मोठया अजगर सापाला रीतसर पकडून व त्याची वनविभागात नोंद करून वनपरिक्षत्र अधिकारी शेंडे यांच्या मार्गदर्शनात कोणाला ही इजा न होता त्याला योग्य ठिकाणी सोडण्यात आले.

सदर घटनास्थळी वनविभागाचे मदतनीस म्हणून शेत मजूर व ग्रामस्थ उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये