ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्रसन्मान कर्तव्याचा

कारगिल युद्धात मिळालेला विजय मनोबल उंचावणारा प्रसंग – कर्नल समिक घोष

शहीद वीरांचे स्मरण आवश्यक ; कारगिल युद्धातील दोन सैनिक अधिकाऱ्यांचा सत्कार

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

केंद्रीय संचार ब्यूरो, क्षेत्रीय कार्यालय, वर्षाचा उपक्रम

    कारगिल युध्दात मिळालेला विजय देशासाठी मनोबल उंचावणारा प्रसंग आहे. देशाच्या संरक्षणासाठी लढताना शहीद झालेल्या वीराचेही स्मरण करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन 21 महाराष्ट्र बटालियन एनसीसी, वर्षाचे कर्नल शमिक घोष यांनी आज येथे केले.

माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या केंद्रीय संचार ब्यूरो, क्षेत्रीय कार्यालय, वर्धा आणि २१ महाराष्ट्र बटालियन एनसीसी, वर्धा तर्फे यापुरावजी देशमुख कॉलेज ऑफ इंजिनिअरोग, सेवाग्राम, वर्धा, श्रीमती सविताराणी नारायणदास जावंधिया महाविद्यालय,देवळी, जि. वर्धा यांच्या सहकार्याने सेवाग्राम येथील बापुरावजी देशमुख कॉलेज ऑफ इंजिनिअरोगच्या सभागृहात कारगिल विजय दिवस कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. मंचावर प्रशासकीय अधिकारी ले. कर्नल मुरूगेशन, केंद्रीय संचार व्यूरो, क्षेत्रीय कार्यालय, वर्धाचे क्षेत्रीय प्रचार अधिकारी हंसराज राऊत, शिक्षणाधिकारी सचिन जगताप, प्रभारी प्राचार्य डॉ. प्रभाकर ढाले, सुबेदार मेजर दिलबाग सिंग, सामाजिक कार्यकर्त प्रशांत सावरकर, एन.सी.सी. अधिकारी कैप्टन मोहन गुजरकर प्रामुख्याने उपस्थित होते.

कर्नल घोष पुढे म्हणाले की, देशाला समर्पित, कर्तव्यदक्ष व सुजाण नागरिकांची नितांत गरज असून या करीता शालेय व महाविद्यालयीन शिक्षणासोबत तरूण तरूणीना सैनिकी शिक्षण देण्याची गरज आहे. कारगिल युद्धातील विकट प्रसंग व त्या परिस्थितीत आपल्या जाबांज सैनिकांनी दाखवलेले शौर्य आजच्या युवापिढी समोर मांडणे आवश्यक आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी इतर मान्यवरांनीही आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी कारगिल युध्दातील परमवीरचक्र विजेते शहीद कैप्टन विक्रम बत्रा, शशोद लेफ्टनंट मनोज पांडे, रायफल मॅन संजय कुमार व ग्रेनेडियर योगिंदरसिंग यादव यांनी दाखविलेल्या शौर्यावर एनसीसी कॅडेट साहिल क्षीरसागर, आर्यन बघेले, राहुल शाहू, अक्षय बोंडे, मोहित भुजाडे व वेदांत पारखी या विद्याथ्यांनी प्रकाश टाकला. कार्यक्रमात कारगिल युध्दात शौर्य गाजविणा-या वर्धा येथील 21 महाराष्ट्र बटालियन एनसीसी वर्धा येथील सैनिक अधिकारी ले. कर्नल मुरूगेशन आणि सुबेदार मेजर दिलबाग सिंग यांचा सत्कार करण्यात आला.

कारगिल विजय दिवस या विषयावर आयोजित केलेल्या चित्रकला व रांगोळी स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. प्रास्ताविक क्षेत्रीय प्रचार अधिकारी हंसराज राऊत यांनी केले. संचालन एन.सी.सी. अधिकारी कॅप्टन मोहन गुजरकर यांनी केले तर आभार प्रशांत सावरकर यांनी मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाचे समापन करण्यात आले.

कारगिल विजय दिनानिमित्त नागपुर विभागीय स्तरावर एन.सी.सी. छात्र सैनिक व महाविद्यालयीन विद्याच्यासाठी पोस्टर मेकिंग व रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यात नागपूर विभागातील विविध जिल्ह्यांमधून एनसीसी कॅम्पकरीता आलेले एनसीसीचे विद्यार्थी व विविध महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. रांगोळी स्पर्धेचे परिक्षक म्हणून प्रा. मेघा फासगे, प्रा. निलिमा बरगट, तर चित्रकला स्पर्धेचे परिक्षक म्हणून फर्स्ट ऑफीसर किशोर चावरे व सेकंड ऑफीसर प्रमोद नागरे यांनी काम पाहिले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी केंद्रीय संचार ब्यूरो वर्षाच्या उमा वरठे, सामाजिक कार्यकर्त दिपक भुतडा, लेफ्टनेंट नंदकिशोर बिजागरे, सुबेदार तुषार पोखरकर, मयुरी उईके, वैष्णवी शिरभाते, थर्ड ऑफीसर व इतर अधिकारी व कर्मचा- यांनी परिश्रम घेतले.

पारितोषिक विजेत्यांची नावे खालीलप्रमाणे आहेत

चित्रकला स्पर्धा

१) पायल मोहन चौके, एसएसएनजे, देवळी प्रथम विजेते –

२) मनस्वी व्ही. पुनसे, गांधी पब्लिक स्कुल, वर्धा – द्वितीय विजेते ३) साक्षी सुधाकर राठोड. एस.एस.एन.जे.. महाविद्यालय, देवळी तृतीय विजेते

४) सई प्रमोद नागरे, न्यू हायस्कुल, आर्वी चतुर्थ विजेते तथा प्रोत्साहन बक्षीस ५) वैष्णवी मारोती कन्नाके, एस.एस.एन.जे., देवळी पाचवे विजेते तथा प्रोत्साहन बक्षीस –

रागोळी स्पर्धा

१) समीक्षा दिनेश ढोबळे व श्रेया दुबे, नगर परिषद, गांधी विद्यालय, आर्वी प्रथम विजेते २) लक्ष्मी सहारे व वैष्णवी डफरे. एस. एस.एन.जे. महाविद्यालय, देवळी द्वित्तीय विजेते

(३) स्नेहल वानखेडे व पल्लवी क्षीरसागर, यशवंत आर्ट कॉलेज, वर्धा – तृतीय विजेते ४) वैष्णवी कन्नाके, एस. एस.एन.जे. देवळी चतुर्थ विजेते तथा प्रोत्साहन बक्षीस .

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये