ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचा वाढदिवसाच्या अनुषंगाने मुलांना नोटबुकचे वितरण

श्री कन्यका सोशल फाउंडेशन द्वारे आयोजन

चांदा ब्लास्ट

नामदार  सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचा 30 जुलै रोजी वाढदिवस झाला त्या अनुषंगाने श्री कन्यका सोशल फाउंडेशन द्वारे आज दिनांक 5 ऑगस्ट रोजी मूल तालुक्यातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा चिमडा, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अकसापुर, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जानाळा, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आगडी या चार शाळांमध्ये मुलांना नोटबुकचे वितरण करण्यात आले आणि श्री कन्यका सोशल फाउंडेशन या प्रकारचे उपक्रम नेहमीच करत असतात कार्यक्रमाच्या वेळेस संस्थेचे पदाधिकारी वैभव कोतपल्लीवार,  गिरीधर उपगन्लावार,  मनोज राघमवर, गिरीश रेगुंडवार,  राजेन्द्र आलुरवार, अखिलेश आईंचवार,  चैतन्य पडगीलवार,अमित कासंनगोट्टूवार, संतोष तुंडूलवार उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये