ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

चाकुने जखमी करणाऱ्या आरोपीस ०५ वर्ष सक्त मजुरीची शिक्षा व दंड

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

वर्धा येथील मा. श्री.एन.बी. शिंदे सा. जिल्हा व सत्र न्यायाधीश,-०२ वर्धा यांनी आरोपी नामे आकाश भिमराव जिवतोडे वय ३० वर्ष रा. हनुमान नगर बोरगांव (मेघे) वर्धा, जि. वर्धा यांस १) कलम ३०७ भादवि मध्ये ०५ वर्ष सक्त मजुरी व ४०,०००/-रु. दंड न भरल्यास ०६ महीणे सक्त मजुरी अशी शिक्षा ठोठावण्यात आली.

हकिकत यातील आरोपी हा वर्धा येथे जाण्यासाठी आटो मध्ये बसला असता त्याने आटो लवकर काढ असे म्हटल्या वरून जखमी याने असे म्हटले कि, दोन चार सवारी भरू दे नंतर निघतो या कारणा वरून जखमीस स्वत जवळील चाकुने गळ्यावर छातीवर आणि पोटावर वार करून गंभीर जखम केले अशा रिपोर्ट वरून गुन्हा नोंद असुन गुन्ह्याचा तपास तत्कालीन तपास अधिकारी पोउपनि/मिलींद पारडकर पो.स्टे. सावंगी (मेघे) यांनी केला व आरोपीने गुन्हा केल्याचा सबळ पुरावा उपलब्ध झाल्यामुळे अप क्र. ०२/१७ कलम ३०७,५०४ भादवि नुसार दोषारोप पत्र मा. न्यायालयात दाखल केले.

सरकारतर्फे अतीरिक्त सरकारी अभियोक्ता, श्रीमती सोमवंशी मॅडम व श्रीमती वेदीका पाटील मॅडम यांनी सदर प्रकरणात सरकार तर्फे एकुण ०९ (नऊ) साक्षीदार तपासले त्यांना पैरवी अधिकारी, मपोहवा/१३२७ अश्विनी वानखेडे यांनी साक्षदारांना मा. न्यायालयात हजर करून मोलाची कामगीरी बजावली. घटनास्थळ व जप्तीचे पंच इतर साक्षीदारांनी अभियोजन पक्षाचे समर्थनीय साक्ष दिल्याने अभियोजन पक्ष, आरोपीने केलेल्या कृत्याचे फळ अपराधसिध्दते पर्यंत पोहचविण्यास मोलाची भुमीका पार पाडण्यास मोलाची मदत झाली. अतीरिक्त सरकारी अभियोक्ता, श्रीमती सोमवंशी मॅडम व श्रीमती वेदीका पाटील मॅडम यांचा यशस्वी युक्तीवाद ग्राहय धरून मा. श्री.एन. बी. शिंदे सा. तदर्थ अति. जिल्हा व सत्र न्यायाधीश, वर्धा यांनी आरोपीस दिनांक ०५/०७/२०२४ रोजी वरील प्रमाणे शिक्षा सुनावली.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये