ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

स्थानिक गुन्हे शाखा वर्धाची कारवाई पो. स्टे सेलु हद्दीत दारूबंदी कायद्यान्वाये रेड करून 6,36,900/- रु. जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

दिनांक 16/11/2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा चे पथक पो.स्टे. सेलु हद्दीत आरोपी चेक व प्रो. रेड करीता पेट्रोलिंग करीत असतांना माहिती मिळाली की मौजा सेलू येथे राहणारा अविनाश मडावी हा त्याचे साथीदारासह बीबी शेत शिवारात संजय गोमासे यांच्या शेतालगत पडीत जागेत नाल्याजवळ गावठी मोहा दारू गाळण्याकरता हातभट्टी लावून गावठी मोहा दारू तयार करीत आहे. अश्या माहितीवरून आरोपी नामे 1) अविनाश बंडुजी मडावी, वय 21 वर्ष, रा. वार्ड नं 03 सेलु जि. वर्धा व 2) निलेश राजु परिसे वय, 26 वर्ष रा. वार्ड नं 04 सेलु जिल्हा वर्धा. यांचेवर रेड कारवाई केली असता दोन्ही आरोपी हे मोक्यावर हजर मिळुन आले. पंचासमक्ष घटनास्थळाची पाहणी केली असता घटनास्थळावर 11 लोखंडी ड्रम कच्चा मोहा रसायन सडव्याने भरलेले, 06 भट्टीचे लोखंडी ड्रम उकळता मोहा रसायने भरलेले, 06 जर्मन घमीले, 12 प्लास्टिक डबकी मध्ये 336 लिटर गावठी मोहा दारू, दारू वाहतुकी करता वापरल्या जाणारी एक बजाज कंपनीची पल्सर 220 मोटार सायकल तसेच इतर भट्टी साहित्य मिळून आल्याने पंचासमक्ष जागीच मौक्काजप्ती पंचनामा कार्यवाही करून दोन्ही आरोपी यांचे ताब्यातून 1) 11 मोठ्या लोखंडी ड्रम मध्ये प्रत्येकी 200 लिटर प्रमाणे 2,200 लिटर कच्चा मोहा सडवा रसायन किंमत 3,30,000/- रु. 2) 06 लोखंडी भट्टीचे ड्रम मध्ये उकळता मोहा सडवा रसायन प्रत्येकी 100 लिटर प्रमाणे 600 लिटर किंमत 90,000/- रु, 3) 17 लोखंडी ड्रम 2000 प्रमाणे 34,000/- रु, 4) 12 प्लास्टिक डबक्यान मध्ये 336 लिटर गावठी मोहा दारू किंमत 67,200/- रु. 5) दारू वाहतूक करण्यासाठी वापरलेली एक बजाज कंपनीची 220 पल्सर मोटरसायकल किंमत 1,00,000/- रू, 6) 12 प्लास्टिक डबकी किंमत 3,600/- रू, 7) 06 जर्मन घमेले किंमत 6000/- रु व इतर भट्टीचे साहित्य 6,100/- रु असा एकूण जु.कि. 6,36,900/- रु. चा मुद्देमाल जप्त करून कच्चा मोहा रसायन सोडवा, उकळता मोहा रसायन सडवा, गावठी मोहा दारू, लोखंडी ड्रम, जर्मन घमिले व इतर दारूभट्टी साहित्य जागीच नाश करून आरोपी विरूध्द पोलीस स्टेशन सेलु येथे गुन्हा नोंद करण्यात आला.

सदर यशस्वी कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. सौरभ कुमार अग्रवाल, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. सदाशिव वाघमारे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री विनोद चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार मनोज धात्रक, महादेव सानप, हर्षल सोनटक्के, अभिषेक नाईक, सर्व स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा यांनी केली आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये