सत्य, अहिंसा आणि ‘जय जवान जय किसान’च्या विचारांना राजुरा काँग्रेसचा सलाम
महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंतीनिमित्त जनसंपर्क कार्यालयात अभिवादन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे
गोंडपिपरी :_ सत्य, अहिंसा आणि सत्याग्रहाच्या माध्यमातून जगाला मानवतेचा मार्ग दाखविणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी तसेच ‘जय जवान, जय किसान’चा प्रेरणादायी संदेश देणारे भारताचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त राजुरा विधानसभा काँग्रेसच्या वतीने दोन्ही महान नेत्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. तहसील कार्यालयाजवळील राजुरा विधानसभा काँग्रेसच्या जनसंपर्क कार्यालयात हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
राजुरा विधानसभा काँग्रेसचे समन्वयक तथा नगराध्यक्ष अरुणभाऊ धोटे यांच्या अध्यक्षतेखाली महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी महात्मा गांधींच्या सत्य, अहिंसा, स्वावलंबन आणि सामाजिक समतेच्या विचारांचे स्मरण करण्यात आले. तसेच लालबहादूर शास्त्री यांच्या साधेपणा, प्रामाणिकपणा आणि देशसेवेच्या कार्याला आदरांजली वाहण्यात आली.
यावेळी राजुरा विधानसभा काँग्रेसचे समन्वयक नगराध्यक्ष अरुणभाऊ धोटे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रंजन लांडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तिरुपती इंदूरवार, माजी सभापती विकास देवाळकर, नगरपरिषद सभापती अनंतकुमार ताजने, पूनम गिरसावळे, नगरसेवक एजाज अहमद, इंदूबाई निकोडे, ज्येष्ठ नागरिक संघाचे सचिव कुर्मदास पावडे, शिवराम लांडे, कवडू सातपुते, धनराज चिंचोलकर, रोशन लांडे, मतीन कुरेशी, शाकीर सय्यद शाकीर, अशोक राव, मधुकर झाडे, सय्यद साबिर, वसंता ताजने, धर्मु नगराळे, घनश्याम खनके यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



