Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

महानगरातील 3300 पूरग्रस्त परिवाराला मिळाली आर्थिक मदत

महानगर जिल्हाध्यक्ष राहुल पावडे यांच्या नेतृत्वात भाजपाने दिला मदतीचा हात

चांदा ब्लास्ट

जुलै महिन्यात अतिवृष्टीमूळे जिल्ह्यात हाहाकार माजला.यात चंद्रपूर महानगर पण पावसाने कवेत घेतले.अतिवृष्टी व बॅक वाटरने अनेकांच्या घरात शिरकाव केला.अश्या पुरग्रस्तांचे सर्व्हेक्षण करून त्यांना तातडीची मदत देण्याचे निर्देश पालमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले होते.यासंदर्भातील सर्व्हेक्षण पूर्ण झाले असून आता पर्यंत 3700 कुटुंबापैकी 3300 कुटुंबांना 5000 रु प्रति कुटुंब मदत देण्यात आल्याने अनेकांच्या चेहऱ्यावर हास्य उमटले आहे.विशेष म्हणजे ना.मुनगंटीवार यांच्या सूचनेप्रमाणे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष राहुल पावडे यांच्या नेतृत्वात महानगर भाजपाने पुरग्रस्तांना मदतीचा हात देत अनेकांना सुरक्षित स्थळी पोहचविले होते.हेच नाहीतर सर्व्हेक्षण दरम्यान अनेक पदाधिकाऱ्यांनी प्रशासनालाही मदतीचा हात दिला.यामुळे अल्पावधीतच पूरग्रस्तांना मदत मिळाली.पालकमंत्र्यांच्या या क्विक ऍक्शनचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

महानगर भाजपा धावली मदतीला

जुलै महिन्यात महानगरातील सिस्टर कॉलनी, रहेमत नगर, भवानीनगर,वृंदावन कॉलनी,परकर नगर, दूध डेरी परिसर,अष्टभुजा नगर, अष्टविनायक मागील परिसर,पठाणपुरा बिंनबा गेट या क्षेत्रात पाण्याचा शिरकाव झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते.अनेकांच्या घरात 3 ते 4 दिवस पाण्याने बस्तान मांडले.या लोकांच्या मदतीला भाजपा जिल्हाध्यक्ष राहूल पावडे यांच्या नेतृत्वात डॉ.मंगेश गुलवाडे,राखी कंचर्लावार,सुभाष कासंगोट्टूवार,रवींद्र गुरनुले,ब्रिजभूषण पाझारे,राहुल घोटेकर,देवानंद वाढई,प्रशांत चौधरी,रवी आसवाणी,विशाल निंबालकर ,छबूताई वैरागडे,सविता कांबळे,वंदना तीखे,शीतल अत्राम,शीला चव्हाण,मायाताई उईके,कल्पना बगुळकर,चंद्रकला सोयाम,महेंद्र जुमडे,अजय सरकार,संदीप आगलावे,दिनकर सोमलकर, विठ्ठल डुकरे,सचिन कोतपल्लिवार ,रवी लोणकर,प्रज्वालंत कडू,सूरज पेदुलवार,चांद सय्यद,सुषमा नागोसे,महेश राऊत,महेश झिटे,रामकुमार आकापेलिवार, धम्मप्रकाश भस्मे,राजेश यादव,प्रवीण उरकुडे,मनोज पोतराजे,सूरज सिंग,सागर भगत,आकाश मस्के ,पप्पू बोपचे,आदींनी मनपा आयुक्त व तहसीलदार यांना सोबत घेऊन पाहणी केली.गरजूंना जीवनावश्यक वस्तूंची मदत व सुरक्षितस्थळी हलविण्याचे काम सतत चालल्याने अनेकांचे मोठे नुकसान टाळले.सर्व्हेक्षणात 3700 कुटुंबियांना पुराचा फटका बसला असून यातील 3300 कुटुंबियांना त्यांच्या खात्यात पैसे टाकून शासनातर्फे मदत देण्यात आली आहे.

पुन्हा मिळणार शासनातर्फे 5000 रुपये मदत
अतिवृष्टी व पुरामुळे नुकसान झाले तर यापूर्वी सरकारकडून पाच हजाराचा धनादेश देण्यात येत होता. मात्र यामध्ये वाढ करून ही रकम 10 हजार करण्यात आली आहे. नुकसानग्रस्त कुटुंबाला प्रत्येकी दहा हजार रुपये मदत म्हणून शासनाकडून देण्यात येणार आहे.महानगरातील पूरग्रस्तांना लवकरच उर्वरित रकम पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या आदेशानुसार प्राप्त होणार आहेत,अशी माहिती भाजपा जिल्हाध्यक्ष राहुल पावडे यांनी दिली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये