ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

एक वर्षापासून विहिरीवर लावण्यासाठी आणलेल्या लोखंडी बचाव जाळ्या धूळ माती व जंगखात

चांदा ब्लास्ट

सिंदेवाही :_ पंचायत समिती अंतर्गत येतं असलेल्या गट ग्रामपंचायत कुकडहेटी ग्रामपंचायतिचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर येत असून अनेक योजनांची व विकासकामाची कागदोपत्री दाखवून प्रत्यक्षात अनेक योजनांची पायमाली झाल्याचे दिसून येत आहे.

कुकडहेटी गट ग्रामपंचायत तर्फे 15 व्या वित्त आयोग अंतर्गत उघड्या व असुरक्षित विहिरींमुळे मनुष्य तसेच वन्यजीवांच्या जीवाला धोका होऊ नये यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाने कुकडहेटी, चारगाव, मोहबोडी, चकबाम्हणी या गावांमध्ये चौकातील मुख्य विहिरीवर एक ते दीड वर्षांपूर्वी संरक्षण कवठे आणि लोखंडी बचाव जाळ्या बसवण्याचे काम सुरू करण्यात आले, विहिरीवरील संरक्षण कवठे ची वरवर काम पूर्ण करण्यात आले.

परंतु लोखंडी बचाव जाळ्या न बसवल्याने त्या आणल्या त्या अवस्थेत विहिरीलगत परिसरात धूळ माती व जंगयुक्त अवस्थेत पडून आहेत. या कामामुळे ग्रामपंचात प्रशासनाची उदानशीलता दिसून येतं आहे. त्या लोखंडी जाळ्यांमुळे खेळणाऱ्या लहान मुलांना व रस्त्यावरून जाणाऱ्या वाहतुकी व्यवस्थेला धोका निर्माण होत आहे. त्यामुळे त्या अस्वस्थ पडून असलेल्या जाळ्या एक तर विहिरीवर लावण्यात यावे किंवा इतरत्र हलवण्यात यावे याची मागणी ग्रामवासिया तर्फे करण्यात येत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये