कोरपना तालुक्यातील ५२ ग्राम पंचायतील सरपंच पदाचे आरक्षण
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर
कोरपना – तालुक्यातील ५२ ग्रामपंचायतच्या सरपंच पदाचे आरक्षण सोडत शुक्रवार दिनांक ४ रोजी तहसील कार्यालय कोरपना येथे काढण्यात आली.
यात अनुसूचित जाती ( महिला) साठी शेरज बूज, सांगोडा, अनुसूचित जाती साठी विरुर गाडेगाव , अनुसूचित जमाती महिला साठी निमणी ,गाडेगाव अनुसूचित जमाती साठी अंतरगाव , भोयगाव ,कोडशी खुर्द, नागरीकाचा मागास प्रवर्ग महिलासाठी लोणी , वनोजा, भारोसा , नामाप्र साठी तळोधी, कवठाळा, नांदगाव , सर्वसाधारण महिलासाठी कोडशी बूज , जेवरा , नारंडा , कढोली खुर्द, बाखर्डी, कुकुडसाथ, कातलाबोडी , सर्वसाधारण साठी शेरज खु, पिंपरी , माथा ,नोकारी , धानोली ,कन्हाळगाव, आवरपूर , अनुसूचित क्षेत्र ( पेसा) अनुसूचित जमाती साठी हिरापूर , बीबी, नांदा ,पिपर्डा , वनसडी, येरगव्हाण, वडगाव, चनई बुद्रुक, रूपापेठ, परसोडा, दुर्गाडी, उपरवाही, पेसा क्षेत्रातील अनुसूचित जमाती महिला साठी थूटरा, लखमापूर, पिंपळगाव, सोनुर्ली ,बेलगाव , खिर्डी , मांडवा , सावलहिरा , पारडी , कोठोडा बूज , मांगलहिरा , येरगव्हाण येथील सरपंचाचे पद राखीव झाले आहे. आरक्षण सोडतीवेळी तहसीलदार पल्लवी आखरे , नायब तहसीलदार करिष्मा वासेकर , संजय भगत , लोकप्रतिनिधी व ग्रामस्थ उपस्थित होते.



