ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

हंसराज अहीर यांच्या जनसंपर्क कार्यालयात शेकडो भगिनींच्या उपस्थितीत रक्षाबंधन सोहळा साजरा

चांदा ब्लास्ट

चंद्रपूर :- भाऊ-बहीणीच्या पवित्र नात्याची विण घट्ट करणाऱ्या रक्षाबंधन या सणाच्या पार्श्वभुमीवर पूर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी दरवर्षीप्रमाणे यंदाही दि. ३ सप्टेंबर २०२६ रोजी शेकडो भगिनींच्या उपस्थितीमध्ये रक्षाबंधनाचा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात साजरा केला.

            निवासस्थानी पार पडलेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हंसराज अहीर तर प्रमुख अतिथी म्हणून आमदार किशोर जोरगेवार यांची प्रमुख उपस्थिती लाभली. याप्रसंगी चंद्रपूरच्या महापौर संगिताताई खांडेकर, ज्येष्ठ नेते विजय राऊत, खुशाल बोंडे, प्रदेश भाजपा ओबीसी मोर्चाचे उपाध्यक्ष डॉ. अशोक जिवतोडे, चंद्रपूर जिल्हा मध्य. सहकारी बॅंकेचे अध्यक्ष रविंद्र शिंदे, माजी उपमहापौर अनिल फुलझेले, युवा नेते रघुवीर अहीर, तुषार सोम, मनपा गटनेते शेखर शेट्टी आदी मान्यवर उपस्थित होते.

            याप्रसंगी हंसराज अहीर यांनी उपस्थित भगिनींना रक्षाबंधन कार्यक्रमाच्या शुभेच्छा देऊन या सणाचे अनन्यसाधारण महत्व असून राखीचा पवित्र धागा हा बहिणभावाच्या अतुट प्रेमाची साक्ष देणारा आहे. बहीणीप्रती कर्तव्य, जबाबदारी व तिच्या संरक्षणाची हमी देणारा हा भारतीय संस्कार, संस्कृतीतील अत्यंत महत्वाचा पवित्र उत्सव असल्याचे अहीर यांनी याप्रसंगी सांगितले.

            प्रत्येक भारतीयांचे सण, उत्सव हे राष्ट्रीयता, ऐक्य, एकात्मता, स्नेह, सहकार्य याची शिकवण देणारे असल्याने या सर्व सणांचे पावित्र्य व सन्मान राखण्याचे प्रत्येक व्यक्तीचे कर्तव्य असल्याचे अहीर यांनी सांगितले.

            आमदार किशोर जोरगेवार यांनी रक्षाबंधन कार्यक्रमातून जबाबदारीची जाणीव होते, महिलांचा सन्मान हीच खरी संस्कृती आहे. त्यांच्यावर होणाऱ्या अन्याय, अत्याचाराविरूध्द उभे ठाकणे, लढा देणे, त्यांच्या न्याय हक्कासाठी पूढे येणे हेच या पवित्र बंधनाचे खरे कर्तव्य असल्याचे त्यांनी याप्रसंगी विचार व्यक्त करतांना सांगितले.

            यावेळी डॉ. अशोक जिवतोडे, रविंद्र शिंदे, तुषार सोम, रघुवीर अहीर, सविता कांबळे यांनीही समयोचित विचार व्यक्त केले. सर्व भगिनींनी हंसराज अहीर, किशोर जोरगेवार, रघुवीर अहीर व अन्य अतिथींना राखी बांधून रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या. अहीर परिवारातर्फे भेट वस्तु देऊन भगिनींचा सन्मान करण्यात आला.

            या कार्यक्रमास सर्वश्री. बलराम डोडाणी, रामकिशोर सारडा, दामोदर मंत्री, मोहन चौधरी, संजय खनके, राजु घरोटे, शाम कनकम, नगरसेविका पुष्पाताई उराडे, अनुजाताई तायडे, शितलताई गुरनुले, सरलाताई कुळसंगे, आशाताई देशमुख, वंदनाताई जांभुळकर, वंदनाताई हातगांवकर, कौसर खान, प्रा. रवि जोगी, स्वप्निल डुकरे, मयुर हेपट, गणेश गेडाम, विनोद खेवले, सुभाष आदमने, पुनम तिवारी, गौतम यादव, राजु येले यांचेसह भाजपाचे प्रमुख पदाधिकारी, महिला व पुरूष कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.

            कार्यक्रमाचे संचालन ऋतुजाताई नागपूरे यांनी केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये