नकुल शिंदे यांची युवासेना पूर्व विदर्भ समन्वयकपदी नियुक्ती

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
युवासेना मध्यवर्ती कार्यालयाच्या वतीने भद्रावती येथील नकुल प्रशांत शिंदे यांची युवासेना पूर्व विदर्भ समन्वयकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
दिनांक ३ सप्टेंबर २०२६ रोजी नियुक्तीपत्राद्वारे ही घोषणा करण्यात आली.
नियुक्तीपत्रानुसार, शिवसेना पक्षाचे मुख्य नेते तथा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा. ना. एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार तसेच खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच युवा सेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक, युवासेना पूर्व विदर्भ सचिव शुभम नवले यांच्यातर्फे नकुल प्रशांत शिंदे यांची ही नियुक्ती करण्यात आली आहे.
युवासेनेच्या माध्यमातून पक्षाच्या संघटनात्मक विस्तारासाठी तसेच सामाजिक व राजकीय क्षेत्रात सक्रियपणे कार्य करून पक्षवाढीसाठी योगदान देणार असल्याचे नकुल शिंदे यांनी सांगितले. आहे.नियुक्ती बद्दल नकुल शिंदे यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.



