ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

केजाजी देवस्थानात सेलू तालुका सरपंच संघटनेतर्फे रक्षाबंधन व सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

घोराड : दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी केजाजी देवस्थान हॉल, घोराड येथे सेलू तालुका सरपंच संघटनेच्या वतीने रक्षाबंधन व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन उत्साहात करण्यात आले. या कार्यक्रमाला जिल्ह्याचे पालकमंत्री तथा गृह राज्यमंत्री आणि आमदार पंकज भोयर यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमास सेलू तालुक्यातील सरपंचांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. यावेळी रक्षाबंधनाच्या निमित्ताने सामाजिक एकोपा व बंधुभावाचा संदेश देण्यात आला. तसेच उपस्थित महिलांनी व विद्यार्थिनींनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांची दाद मिळवली.

या प्रसंगी भाजप तालुका अध्यक्ष प्रफुल्ल खोडे, माजी जिल्हाध्यक्ष तथा जि.प. वर्धा सरिता ताई गाखरे, वैशाली ताई येरावार, शीतल ताई भोयर यांच्यासह परिसरातील महिला, पुरुष व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या माध्यमातून रक्षाबंधनाचा सण सामाजिक सलोखा, महिला सन्मान आणि संस्कृतीच्या जतनाचा संदेश देत उत्साहात साजरा करण्यात आला.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये