Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

भद्रावती तालुका ओला दुष्काळ जाहीर करा

युवा क्रांती संघटनेची मागणी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी अतुल कोल्हे

अतिवृष्टीमुळे शेतपिकाचे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करुन तात्काळ शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजारांची नुकसान ‌भरपाई देण्याची मागणी किसान युवा क्रांती संघटनेचे जिल्हा अध्यक्ष रविंद्र गेजीक यांनी तहसिलदार यांचेकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

तालुक्यात गेल्या १० ते १५ दिवसांपासून वादळी वारा व मेघगर्जनेसह मुसळधार पावसाने हजेरी लावली असल्याने भद्रावती तालुक्यातील सर्व नदी नाले व तलाव भरगच्च भरुन वाहू लागले. सतत धार होणाऱ्या पावसामुळे शेतामध्ये पावसाचे पाणी साचून शेतात असलेल्या पिकांचे नुकसान झाले असल्याने शेतकरी अधिक चिंताग्रस्त झाला आहे .त्यामुळे भद्रावती तालुका ओला दुष्काळ जाहीर करुन शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजारांची नुकसान भरपाई देण्याची मागणी किसान युवा क्रांती संगठना भद्रावती यांनी केले आहे. यात सोयाबीन, तुर ,कापूस,धान या सारख्या पिकांचे रोपटे वाहुन गेले आहे. तरी तलाठी, कृषि सहायक ,अधिकारी यांनी पिकाची पाहणी करून पंचनामा करावा व तसा नुकसान झाल्याचा अहवाल शासनाला पाठऊन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी.

या आशयाचे निवेदन संघटनेचे रविंद्र गेजिक यांनी तहसिलदार अनिकेत सोनवणे यांचेकडे सोपविले.यावेळी किसान युवा क्रांति संगठनेचे पदाधिकारी, पिपरी गावचे उपसरपंच खटाले, भारत बेलेकर, सूरज चौधरी, रोशन मानकर, विकास गजभे, रोहित वेलेकर, सामाजिक कार्यकर्ते दिनेश विरूटकर उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये