ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

स्थानिक गुन्हे शाखा वर्धा यांचे वर्धा मर्चंट नागरी सहकारी पत संस्था येथील खाते धारकांना आव्हान

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

 दिनांक २२/०७/२०२२ ते दिनांक ०८/०७/२०२६ पर्यंत या कालावधी मध्ये वर्धा मर्चट नागरी सहकारी पत संस्था मर्या. वर्धा समता नगर, वर्धा. या पतसंस्थे मध्ये आर.डी. (R.D) व एफ.डी. (F.D) तसेच इतर स्किम मध्ये १३% व्याजाचे आमीष देवुन समता नगर, सेवाग्राम, वर्धा येथिल इतर नागरीकांनी मोठ्या प्रमाणात वर्धा मर्चेंट नागरी सहकारी पत संस्था मर्या. वर्धा या पतसंस्थे मध्ये रक्कम गुंतवणुक केल्यावर गुंतवणुक मुदत वेळ संपल्यावर देखील. वर्धा मर्चेंट नागरी सहकारी पत संस्था मर्या. वर्धा या पतसंस्थेने गुंतवणुकदार / पिडीत यांची मोठ्या प्रमाणात गोळा केलेली रक्कम ४,५०,५८,७६६/- रु. परत न करता पतसंस्था बंद करुन अपहार करुन फसवणुक केल्याचे सदर बाबत आरोपी १) भीमराव ऊर्फ भीमा राजेंद्र शंभरकर रा. समता नगर, वर्धा विरुद्ध पोलीस स्टेशन वर्धा शहर येथे अपराध क्रमांक ९८३/२६ कलम 316 (5), 318 (4), भारतीय न्याय संहिता सहकलम 3 MPID ACT 1999. नुसार गुन्हा नोंद असुन सदर गुन्हयाचा तपास आर्थिक गुन्हे शाखा वर्धा येथे. मा. पोलीस अधिक्षक सौरभ कुमार अग्रवाल, मा. अपर पोलीस अधिक्षक सदाशिव वाघमारे, विनोद चौधरी प्रभारी पोलीस उप अधिक्षक आर्थिक गुन्हे शाखा वर्धा यांचे मार्गदर्शनात पोलीस उप निरिक्षक धिरज खोब्रागडे, व त्यांचे सहकारी अमंलदार आर्थिक गुन्हे शाखा वर्धा करीत आहेत.

याद्वारे सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते आहे. कि, वरील कंपन्यामध्ये ज्या-ज्या नागरीकांनी रक्कम गुंतवणुक केलेली असेल व आजपर्यंत परतफेडीचे फार्म भरुन दिलेले नाही अशा सर्व नागरीकांनी आर्थिक गुन्हे शाखा वर्धा येथे नागरीकांकडे उपलब्ध असलेल्या गुंतवणुक रक्कमे संबंधाने पुराव्याचे कागदत्रासह 07 दिवसात कार्यालयीन वेळेत येवून सादर करावे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये