राज्यातील ऑटोरिक्षा चालकांचे तीन चाकी ऑटोरिक्षा बंद
चांदा ब्लास्ट
चंद्रपूर :_ महाराष्ट्र ऑटोरिक्षा चालकमालक असोसिएशन, जि. चंद्रपूर तसेच बहुजन हिताय ऑटो चालक मालक कामगार संघटना जि. चंद्रपूर महाराष्ट्र नवनिर्माण वाहतुक सेना ऑटो संघटना, जि. चंद्रपूर यांच्या वतीने दि. २३ नोव्हेंबर २०२६ ला चंद्रपूर जिल्हयातील ऑटोरिक्षा बंद व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणा आंदोलन सकाळी ११ ते ०३ वाजेपर्यंत आयोजित केलेले आहे. तरी चंद्रपूर जिल्हयातील सर्व ऑटोरिक्षा चालकांनी आपला ऑटोरिक्षा व्यवसाय बंद करुन या आंदोलनात मोठया संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र खांडेकर, जिल्हाध्यक्ष मधुकर राऊत, सचिव सुनिल धंदरे, उपाध्यक्ष विनोद चन्ने, जहीर शेख, जाकीर शेख, कुंदन रायपुरे, रवी आंबटकर, खुशाल साखरकर राजीव मोहुर्ले, राजु यादव, प्रमोद वेरुळकर, रमेश मून, मुशिर शेख, वासुदेव कुबडे, आशिष आस्वले, प्रकाश पात्रा, विनोद कुळमेथे, बाळू मेश्राम, कुंदन कटारे, परिमल, सचिन बांगडे, अविनाश उकेकर, राजु गजर, कैशला बोंडे, तामगाडगे, राजकुमार, सुनिल देऊळकर, विश्वेश्वर राऊत यांनी आवाहन केले आहे.
ऑटोरिक्षा चालकांच्या मागण्या खालीलप्रमाणेः
१. चंद्रपूर शहरामध्ये विना परवाना सफेद नंबर प्लेट रेपिडो ओला उबेर या कंपन्याचे बाईक टॅक्सी अनाधिकृतपणे व्यवसाय करीत आहे. त्या तात्काळ बंद करणे व अॅप वरुन बाईक टॅक्सी ऑप्शन बंद करणे.
२. इलेक्ट्रीक ऑटोरिक्षा बिना परवाना अनाधिकृत व्यवसाय करीतआहे. त्यांना परवाना देऊन नियमित करुन घेण्यात यावे किंवा पेट्रोल, डिझेल, एिएनजी, एलपीजी आमच्या ऑटोरिक्षा यांचे परवाना रद्द करण्यात यावे.
३. धर्मवीर आनंद दिघे साहेब, महाराष्ट्र ऑटोरिक्षा मिटर्ड टॅक्सी चालक कल्याणकारी महामंडळाची जिल्हा समिती तात्काळ तयार करण्यात यावी.
४. धर्मवीर आनंद दिघे साहेब, महाराष्ट्र ऑटोरिक्षा मिटर्ड टॅक्सी चालक कल्याणकारी महामंडळ यांची वार्षिक फी भरण्याकरीता कोणतीही वेबसाईड किंवा ऑफीसीएल पर्याय उपलब्ध नाही. तरी सुविधा तात्काळ चालु करण्यात यावा.
५. धर्मवीर आनंद दिघे साहेब, महाराष्ट्र ऑटो रिक्षा मिटर्ड टॅक्सी चालक कल्याणकारी महामंडळ तर्फे देण्यात येणारा सन्मान निधी रुपये १०,०००/- बंद करण्यात यावे आणि ऑटो चालकांना वय वर्षे ६० वर्षानंतर पेन्शन योजना चालु करण्यात यावी.


