नवदांपत्यांना दिले भारतीय संविधान भेट घर_घर उपक्रमाअंतर्गत

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
नवदांपत्यांना दिले भारतीय संविधान भेट घर_घर उपक्रमाअंतर्गत देवळी तालुक्यातील गौळ येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक भवन येथे पार पडलेल्या मंगलमय परिणय सोहळ्यात तहसील देवळी जिल्हा वर्धा येथील देवचंदजी शामराव थूल यांची कन्या समीक्षा उर्फ तन्नू व सुखदेवे या दांपत्यांना भारतीय संविधान भेट देण्यात आली. यावेळी वर्धेचे सामाजिक कार्यकर्ता तथा प्रबोधनकार पद्माकर कांबळे यांनी दांपत्याला आशीर्वाद देऊन स्वागत केले. नागपूर जिल्ह्याचे जुनी अजनी नागपूर येथील दिपकराव सुखदेवे यांचे ज्येष्ठ चिरंजीव दीपरत्न उर्फ सुनिदध त्यांचा आगळावेगळा उपक्रम राबवून व बौद्ध संस्कृतीनुसार विवाह सोहळा सुमेध शेलकर यांनी पार पडला.
या सोहळ्याला सामाजिक कार्यकर्ते, श्री संजय डबले बोपापूर दिघी,विलास नगराळे समाज सेवक वायगाव,निपाणी, प्रल्हाद गोटे, नरेश खोब्रागडे बोरधरण सेलू, प्रदीप डबले टालेगाव राहुल थूल, सुमेध शेलकर , संजय नामदार, पवन नामदार, अशोकराव मुनेश्वर देवळी, प्रेमदासजी थूल नागपूर, जयपाल जीवने, दिलीप कांबळे गौळ, जयेंद्र गोटे, प्रकाश खैरकर वर्धा, दीपक वाटकर, पवन भाऊ गंगाम, बाबाराव गावंडे यवतमाळ वैभव नगराळे काळोणा चोरे भाग्यवान भस्मे विलास कांबळे गौळ संतोष लोहवे यवतमाळ वैभव ऑनलाईन सर्विसेस वायगाव निपाणी.इत्यादी लग्न सोहळ्याला उपस्थित होते.



