ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

देऊळगाव राजा तालुका सेवानिवृत्त कर्मचारी संघटनाच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती साजरी 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

देऊळगाव राजा तालुका सेवा निवृत्त कर्मचारी संघटना देऊळगाव राजा, सहकार महर्षी भास्करराव शिंगणे सार्वजनिक वाचनालय देऊळगाव राजा, जेष्ठ नागरिक संघटना, जनसेवा सामाजिक संघटना च्या वतीने विरंगुळा भवन आठवडी बाजार परिसर देऊळगाव राजा येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची ३६९वी जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून श्री बळीराम मापारी होते. प्रमुख पाहुणे म्हणून श्री घनश्यामजी भंडारे,के.पी.खांंडेभराड होते.

यावेळी श्री प्रकाश अहिरे, प्रा.अशोक डोईफोडे, गोविंदराव बोरकर, गोविंदराव अहीरे, सतिश कुळकर्णी उपस्थित होते छत्रपती संभाजी महाराजांच्य प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले, याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला संचालनप्रकाश अहिरे यांनी केले तर आभार प्रदर्शन .गोविंद बोरकर यांनी केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये