ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जुन्या वादावरुन मुलाचे अपहरण – ४ आरोपी ताब्यात

गुन्ह्यात वापरलेला एकूण 7 लाख 12 हजारावर मुद्देमाल जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

दि. 21/07/23 रोजी फिर्यादी नथ्थुजी रा. रामटेके, रा. वार्ड क्रं. 2 समुद्रपूर यांनी पो.स्टे. ला रिपोर्ट दिली कि, फिर्यादीचा लहान मुलगा यांचे झेंडा चौक समुद्रपूर येथे चिवड्याचे दुकान असून, घटनेवेळी त्यांच्या मुलगा दुकानात साफसफाई करण्याकरीता गेलेला होता. परंतु बराच वेळ होवून सुध्दा तो परत न आल्याने, त्यांनी दुकानात जावून बघितले असता, त्यांना लोकांकडून माहिती मिळाली कि, त्यांच्या मुलाला समुद्रपूर येथे राहणारा लाला कोराम व त्याचे 3 अनोळखी साथीदारांनी एका पांढऱ्या रंगाच्या महिंद्रा झायलो कार क. एम. एच. 27 असलेल्या, जबरदस्तीने टाकून अपहरण करून घेवून गेलेले आहे. त्यावरून त्यांनी पो.स्टे. ला रिपोर्ट दिल्याने, पो.स्टे. समुद्रपूर येथे अप क्र. 470 / 23 कलम 365, 34 भा. द.वी. चा गुन्हा नोंद करण्यात आला होता.

सदरचा गुन्हा नोंद होताचं पोलीस स्टेशन समुद्रपूर येथील पोलीस स्टाफ अंकुश उर्फ लाला कोराम याची तांत्रिक पध्दतीने माहिती घेवून व गोपणीय माहितीच्या आधारे आरोपीतांचा शोध घेणेकामी तात्काळ रवाना झाले. सदर माहितीवरून आरोपी हे मौजा खडकी, तह. सेलू वर्धा ते नागपूर महामार्गावर असल्याबाबत माहिती प्राप्त होताचं, स्थानिक सेलू पोलीसांशी संपर्क साधून त्यांना गुन्हयाबाबत माहिती देवून, त्यांचे साहाय्याने संयुक्तरित्या अपहरणकर्ते, पिडीत व गुन्हयात वापरलेले वाहन ताब्यात घेण्यात आले. पो.स्टे. परतीनंतर आरोपी नामे 1 ) अंकुश उर्फ लाला लक्ष्मण कोराम, वय 45 वर्ष, रा. वार्ड क 1 समुद्रपूर, 2) शांतनु धनेश रंगारी, वय 20 वर्ष, रा. वार्ड क 1 समुद्रपूर, 3) बादल उत्तम वरठी, वय 28 वर्ष, रा. वार्ड क 2 खडकी, तह. सेलु, 4) समीर अमृत उईके, वय 19 वर्ष, रा. वार्ड क 1 नवरगाव तह. सेलु यांना सदर गुन्हयात अटक करण्यात आली. तसेच त्यांचेकडून गुन्ह्यात वापरलेली एक महिंद्रा झायलो कार क्र. एम. एच. 27 ए. आर. 4922 व एक स्मार्ट फोन जु.किं. 7,12,500 रू. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर गुन्हयातील मुख्य आरोपी लाला कोराम व फिर्यादीचा मोठा मुलगा यांच्यामध्ये असलेल्या जुना वाद असल्याने, तो राग मनात बाळगून मुख्य आरोपी क 1 याने त्याचे ईतर साथीदारासह सदरचा गुन्हा केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. गुन्हयाचा पुढील तपास सुरू आहे.

सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक मा. श्री. नुरूल हसन सा अपर पोलीस अधिक्षक मा. श्री. डॉ. सागर कवडे सा., उपविभागीय पोलीस अधिकारी मा. श्री. रोशन पंडीत सा. यांचे मार्गदर्शनात पोलीस स्टेशन समुद्रपूरचे पोलीस निरीक्षक मा. श्री. प्रशांत काळे सा. यांचे निर्देशाप्रमाणे पो.उप.नि. पंकज मसराम, स्वप्नील भोजगुडे (पो.स्टे. सेलू), सोबत पो.हवा. अनिल भोवरे (पो.स्टे. सेलू), अरविंद येनुरकर, विनायक खेकडे, किशोर ताकसांडे, पो.ना. रवि पुरोहित, कपिल मेश्राम, अक्षय राउत (स्था.गु.शा. वर्धा) पो.शि. वैभव चरडे, लोकेश पावनकर (पो.स्टे. सेलू) यांनी केली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये