ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

ख्रिस्तानंद विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारांचे विविध मागण्यांसाठी बेमुदत कामबंद आंदोलन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदू गुद्देवार

ब्रह्मपुरी :- स्थानिक ख्रिस्तानंद स्कुल अँड ज्युनिअर कॉलेज येथील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारांनी आपल्या विविध मागण्यांसाठी बेमुदत कामबंद आंदोलन विद्यालया समोर, बॅ. राजाभाऊ खोब्रागडे चौकात दि. 13 फेब्रुवारी पासून सुरु केले.आंदोलनाला ब्रम्हपुरी विधानसभेचे आमदार विजयभाऊ वडेट्टीवार, माजी आमदार अतुल देशकर,ब्रम्हपुरी शिवसेना प्रमुख भूषण रामटेके, डॉ. मिलिंद भणारे यांनी भेटी देऊन कर्मचारांचा समस्या जाणून घेतल्या.शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारांनी खालील मागण्या असल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले.

 1)कर्मचाऱ्यांच्या पगाराची (BESIC, DA, HRA) विभागणी न करता संपूर्ण पगाराची नोंद पूर्वीप्रमाणे पगारबुकावर घेण्यात यावी. 2)ग्रॅज्युएटीची रक्कम शेवटच्या संपूर्ण पगारावर देण्यात यावी. 3)EPF ला कर्मचाऱ्यांची रक्कम आमच्या संपूर्ण पगाराच्या बारा टक्के कपात करून पूर्वीप्रमाणे जमा करावी. 3)शासन निर्णयाप्रमाणे कर्मचाऱ्यांना लागू असलेल्या किरकोळ रजा, वैद्यकीय रजा, अर्जित रजा व इतर रजा नियमाप्रमाणे घेण्याची मुभा मिळावी.

4)शाळा प्रशासनाने जुलै 2025 मध्ये कर्मचाऱ्यांची अत्यंत अल्प प्रमाणात पगार वाढ केलेली असून महागाईच्या तुलनेत योग्य ती पूर्वीप्रमाणे पगारवाढ करावी. 5)कर्मचाऱ्यांवर स्वमर्जीने कोणतेही नाहक निर्णय लागू नयेत व त्यांचे पालन करण्याची सक्ती करू नये.

6)कोणत्याही कर्मचाऱ्यांना शुल्लक कारणा वरून शोकास देण्यात येऊ नये.

7) संस्थेने कोणतेही महत्त्वाचे निर्णय घेताना सर्व कर्मचाऱ्यांना विश्वासात घेऊन घ्यावे व त्याची लिखित प्रत कर्मचाऱ्यांना द्यावी 8)कोणत्याही कर्मचाऱ्यांना मानसिक त्रास देऊ नये व शाळेतून काढण्याची धमकी देऊ नये.

9) कोणत्याही ठोस कारणा शिवाय कर्मचाऱ्याला सेवेतून कमी करू नये.

10)शाळेचे सर्व शैक्षणिक कार्यालयीन कामकाज मोबाईल द्वारे सुरू असताना शिक्षकांना मोबाईल बंदीची सक्ती करू नये.

      शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारांनी विविध मागण्या पूर्ण करण्या हेतू मागील पाच सहा महिन्यापासून शाळा प्रशासनाला विविध निवेदने दिलेत पण त्याचे आजतागत समाधानकारक लिखित उत्तर मिळाले नसल्याने शेवटी शाळा प्रशासनाच्या त्रासाला कंटाळून बेमुदत कामबंद आंदोलन करीत असल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले.पत्रकार परिषदेला ख्रिस्तानंद विद्यालयातील बहुसंख्य कर्मच्यारी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये