जिल्हयातील १३४ पोलीस शिपाई या रिक्त पदांसाठी पोलीस भरती

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
वर्धा जिल्हयातील १३४ पोलीस शिपाई या रिक्त पदांसाठी (पुरुष व महिला पोलीस शिपाई) पोलीस भरती श्री. सौरभकुमार अग्रवाल पोलीस अधीक्षक, वर्धा यांचे अधिपत्याखाली आयोजित करण्यात आली आहे.
सदर भरती प्रक्रीया एकूण १३४ रिक्त पदांकरीता होत असून आज दिनांक १२.०२.२०२६ रोजी शारीरीक चाचणी करीता एकुण ७०० उमेदवार बोलविण्यात आले होते. त्यापैकी प्रत्यक्षात एकुण ५७६ उमेदवार आज रोजी हजर आले. त्यापेको शारीरीक मोजमापात अपात्र उमेदवार ४० व मैदानी चाचणीत अपात्र ठरलेले उमेदवार एकुण १३२ तसेच मैदानी चाचणीत पात्र ठरलेले उमेदवार एकूण ४०४ असे आहेत.
तसेच शारिरीक चाचणीकरीता आलेल्या उमेदवारांची खाण्यापिण्याची गैरसोय होऊ नये याकरीता पोलीस मुख्यालय येथील मैदानावरच माफक दरात पाणी, बिस्कुट, फळे व इतर खाण्याच्या वस्तूंची सोय करण्यात आलेली आहे.


