प्रतिबंधित जुगार खेळावर पोलिसांची धाड : चौघे ताब्यात
रोख रकमेसह ४ लाख २९ हजाराचा मुद्देमाल जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
भद्रावती पोलिस स्टेशनच्या हद्दीतील पिरली शिवारात काही इसम जुगार खेळत असल्याची गुप्त माहिती मिळताच भद्रावती पोलिसांनी सापळा रचून धाड मारली असता चौघे जणांना ताब्यात घेऊन घटनास्थळावरून ४.२९ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
घनश्याम शेषराव उताणे वय.५० रा. मांगली, दीपक नथूजी बोथले वय ३२ रा. वाघेडा, मारोती उर्फ नंदकिशोर झाडे वय.४२ रा. पिरली, हनुमान ज्ञानेश्वर देठे वय ३५ रा. पिरली अशी अटकेतील आरोपींची नावे असून घटनास्थळावरून पाच हजार रुपये रोख व सहा दुचाकी असा एकूण चार लाख एकोणतीस हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. आरोपीविरोधात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यानुसार पोलिस स्टेशन भद्रावती येथे अपराध क्रमांक../२६ कलम १२ अ मजुका प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
सदरची कारवाई मा. पोलिस अधिक्षक मुमक्का सुदर्शन यांचे निर्देशानुसार अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे , उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल, यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक योगेश्वर पारधी यांच्या नेतृत्वात गुन्हे शोध पथकातील ग्रेड पोलिस उपनिरिक्षक गजानन तुपकर, सफौ महेंद्र बेसरकर, पो.ह अनुप आस्टूनकर, जगदीश झाडे, विश्वनाथ चूदरी, गोपाल आतकुलवार पो अंमलदार खुशाल कावळे, योगेश घाटोडे संतोष राठोड, रोहित चिटगीरे आदींनी केली. फरार आरोपी
विरोधात पुढील तपास भद्रावती पोलीस करीत आहेत.



