ताज्या घडामोडी

त्या शिक्षिका व मुख्याध्यापकांविरोधात अखेरीस गुन्हा दाखल – चांदा ब्लास्टच्या बातमीचा दणका

शासनाची फसवणूक करणारी शिक्षिका व मुख्याध्यापक कायद्याच्या कचाट्यात

चांदा ब्लास्ट तालुका प्रतिनिधी

आशिष रैच राजुरा

चांदा ब्लास्ट न्युज पोर्टल ने रविवार दिनांक 1 ऑक्टोबर रोजी प्रकाशित केलेल्या बातमीचा धसका घेऊन जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या प्रशासनाने अखेरीस शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी तुकडोजी महाराज बहुउद्देशीय शिक्षण संस्था चांदा चंद्रपूर द्वारे संचालित श्री प्रभु रामचंद्र विद्यालय नांदा फाटा येथिल शिक्षिका व माजी अध्यक्ष जिल्हा परिषद चंद्रपूर ह्यांच्या सुविद्य पत्नी योगिता चरणदास शेडमाके ह्यांनी एका शैक्षणिक संस्थेत शिक्षिका म्हणून कार्यरत असताना व त्यांच्या पदाला शिक्षणाधिकारी (माध्य.) ह्यांनी मान्यता दिली असतानाही दुसऱ्या संस्थेत नोकरी पत्करली व त्या संस्थेतून देखिल शिक्षणाधिकाऱ्यांची मान्यता प्राप्त असल्याचे कागदोपत्री दाखवले.

वास्तविक बघता एकाच वेळी दोन संस्थांमध्ये नोकरी करणे गुन्हा असतानाही त्यांनी हे केले व शासनाची फसवणूक केली ह्यांसंदर्भातील विस्तृत बातमी चांदा ब्लास्ट ने खालील शिर्षकाअंतर्गत प्रकाशित केली होती.

जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षांच्या शिक्षिका पत्नीने केली शासनाची फसवणूक

===========================

एकाचवेळी मिळविली दोन संस्थांसाठी शिक्षिका पदाची वैयक्तिक मान्यता
===========================

प्रशासकीय चौकशीत दोष सिध्द
===========================

गुन्हे दाखल करण्यास शिक्षणाधिकाऱ्यांची चालढकल
===========================

सविस्तर बातमी वाचा👇🏻👇🏻

https://chandablast.com/?p=10998

चांदा ब्लास्टची पहिली बातमी प्रकाशित होताच शिक्षण विभाग खडबडून जागे झाले असुन प्रकरणाच्या चौकशी अहवालावर व शिक्षण उपसंचालकांच्या आदेशावर जवळपास 9 महिने पडून असलेली धूळ झटकून अखेरीस गडचांदुर पोलीस ठाण्यात शिक्षिका योगिता चरणदास शेडमाके व शाळेचे मुख्याध्यापक व संस्थेचे सचिव अनिल मुसळे ह्यांचेवर शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी भादंवि च्या  कलम 420 सह इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आल्याची खात्रीलायक माहिती प्राप्त झाली आहे.

काय आहे मुख्याध्यापकांचा प्रताप? कशी मिळविली मान्यता? वाचा पुढील भागात ………

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये