ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अमृतमहोत्सवात शिवकालीन वस्तुंचे प्रदर्शन

संग्राहक अमित गुंडावार यांचे अभिनव उपक्रम

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

         लोकसेवा मंडळ संचालित लोकमान्य टिळक विद्यालय भद्रावती येथे लोकसेवा मंडळाचा अमृत महोत्सव मोठ्या दिमाखदार व आगळ्या वेगळ्या प्रबोधन, सांस्कृतिक, बौद्धिक, कार्यक्रमाने साजरा करण्यात येत आहे. दिनांक २० रोजी खुद्द राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अमृतमहोत्सवी आयोजनास ऑनलाईन शुभेच्छा दिल्या तसेच या कार्यक्रमाच्या प्रारंभी लोकमत वृत्तपत्र समूहाचे अध्यक्ष विजयबाबू दर्डा, आमदार सुधीर मुनगंटीवार, बळवंतदादा गुंडावार, मनोहर पारधे, आमदार देवराव भोंगळे, व अध्यक्ष चंद्रकांत गुंडावर यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवकालीन वस्तू प्रदर्शनाचे उद्घाटन केल्या गेले.

दिनांक २० जानेवारी ते २६ जानेवारी दरम्यान सुरू असलेल्या महोत्सवाचे खरे आकर्षण शिव कालीन वस्तू ठरल्या,ऐतिहासिक अनुभूती देणारी हि शिवकालीन वस्तू प्रदर्शनी विशेष आहे.

अमित चंद्रकांत गुंडावर यांच्या आवड, जिद्द, छंद, चिकाटी, यातून त्यांनी पुरातन व दुर्मिळ, मौल्यवान वस्तूंचे संकलन करून भावी पिढीसमोर ठेवलेला ठेवा अमूल्य व आदर्शवत आहे. सदर प्रदर्शनात शिवकालीन, शस्त्र, चिलखत, पगडी, शिरपेचातील पगडी अरबी, संस्कृत, पारशी, खलिते, ताम्रपट, कुलूप, अडकित्ता, आदी शिवकालीन, दुर्मिळ वस्तू विशेष आकर्षण आहेत. स्वतः संस्थापक अमित गुंडावर आवर्जून सर्व ऐतिहासिक वस्तू त्याचा कालखंड, उपयोगिता, इत्यादी महत्व विषद करून विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर घालतात.

 २९ ते २६ जानेवारी दरम्यान सुरू प्रदर्शनी चा लाभ अनेक विद्यार्थी व भद्रावती करानी घेतला आहे.

  लोकसेवा मंडळाचे संस्थापक अध्यक्ष कै. निळकंठराव गुंडावार यांच्या जयंती समारोह प्रसंगी, शिक्षक आमदार सुधाकर अडबाले, वरोरा भद्रावती क्षेत्राचे आमदार करन देवतळे, आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी भेट देऊन लोकसेवा मंडळाच्या कार्याचा गौरव केला. व या ऐतिहासिक वस्तू प्रदर्शनी चा आवर्जून लाभ घेतला. या संपूर्ण समारोहात शाळेचे शिक्षक, व शिक्षकेतर कर्मचारी यांनी प्राचार्य रुपचंद धारणे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष योगदान देऊन सहकार्य केले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये