आंतरराष्ट्रीय क्रीडा क्षेत्रात सरदार पटेल महाविद्यालयाचा सुवर्ण यश
इंडो–नेपाल इंटरनॅशनल टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत स्वप्नील जितेंद्र गोंड याला सुवर्ण पदक

चांदा ब्लास्ट
चंद्रपूर :_ येथील सरदार पटेल महाविद्यालयातील शारीरिक शिक्षण व क्रीडा विभागातील खेळाडू स्वप्नील जितेंद्र गोंड यांनी आंतरराष्ट्रीय क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत इंडो–नेपाल इंटरनॅशनल टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावले आहे. ही प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय स्पर्धा नुकतीच नेपाळ देशातील पोखरा येथे पार पडली.
भारत व नेपाल या दोन देशांतील नामांकित आणि अनुभवी संघांच्या सहभागाने ही स्पर्धा अत्यंत चुरशीची ठरली. अशा उच्च दर्जाच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत स्वप्नील गोंड यांनी आपल्या उत्कृष्ट खेळकौशल्याचे, आत्मविश्वासाचे प्रभावी प्रदर्शन करत सुवर्ण पदकावर आपले नाव कोरले. त्यांच्या या दैदीप्यमान यशामुळे सरदार पटेल महाविद्यालय तसेच संपूर्ण जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्राचा नावलौकिक आंतरराष्ट्रीय स्तरावर वाढला आहे.
स्वप्नील जितेंद्र गोंड हे सातत्यपूर्ण मेहनत, कठोर सराव, शिस्तबद्ध जीवनशैली आणि खेळाप्रती असलेल्या निष्ठेसाठी ओळखले जातात. महाविद्यालयीन तसेच विविध स्पर्धांमधील त्यांच्या सातत्यपूर्ण उत्कृष्ट कामगिरीचे फलित म्हणजे हे सुवर्णपदक होय. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करताना त्यांनी दाखवलेला खेळ कौशल्यपूर्ण व प्रेरणादायी ठरला.
या यशामागे शारीरिक शिक्षण व क्रीडा विभागाचे मार्गदर्शन, क्रीडाशिक्षक व प्रशिक्षकांचे मोलाचे सहकार्य, तसेच महाविद्यालयाने उपलब्ध करून दिलेल्या उत्तम क्रीडा सुविधा व पोषक वातावरणाचा मोठा वाटा आहे. स्वप्नील गोंड यांच्या यशामुळे महाविद्यालयातील इतर खेळाडूंनाही नवी प्रेरणा मिळाली आहे असे स्वप्नील जितेंद्र गोंड यांनी नमूद केले.
या ऐतिहासिक यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. एम. काटकर, उपप्राचार्य डॉ. स्वप्निल माधमशेट्टीवार, शारीरिक शिक्षण व क्रीडा विभागप्रमुख डॉ. कुलदीप आर. गोंड, डॉ. पुष्पांजली कांबळे, प्रा. विकी पेटकर, प्राध्यापकवर्ग, शिक्षकेत्तर कर्मचारी व खेळाडू यांच्या वतीने स्वप्नील जितेंद्र गोंड यांचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन करण्यात आले असून, त्यांच्या भावी क्रीडा वाटचालीसाठी उज्ज्वल यशाच्या शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.
दरम्यान सर्वोदय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अरविंद पोरेड्डीवार, कार्याध्यक्ष आ. किशोर जोरगेवार, उपाध्यक्ष सुदर्शन निमकर, सगुणाताई तलांडी, सचिव प्रशांत पोटदुखे, सहसचिव डॉ. किर्तीवर्धन दीक्षित, कोषाध्यक्ष संदीप गड्डमवार, सर्वोदय शिक्षण मंडळाचे कार्यकारी सदस्य, राकेश पटेल, सुरेश पोटदुखे, जिनेश पटेल यांनीही स्वप्नील गोंड यांचे अभिनंदन करीत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.



