मोहसीनभाई जव्हेरी कन्या विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, बल्लारपूर येथे सांस्कृतिक कार्यक्रम

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रशांत रणदिवे
मोहसीनभाई जव्हेरी कन्या विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय बल्लारपूर येथे सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे.
सांस्कृतिक कार्यक्रमाची सुरुवात शाळेच्या प्राचार्या मा. असमा खान मॅडम, पर्यवेक्षिका सुनिता कांबळे मॅडम तसेच हर्षा वरगंटवार मॅडम (मुख्याध्यापिका स्व. कुलसमबाई जव्हेरी कन्या हिंदी प्राथ. शाळा), रेहाना अली मॅडम (मुख्याध्यापिका हकीमुद्दिन जव्हेरी कन्या मराठी प्रा. शाळा) यांनी विद्येची देवता माता सरस्वती यांच्या फोटोला मलार्पण व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचा शुभारंभ केला. सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये इयत्ता पाचवी ते बारावी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यामध्ये गुजराती नृत्य, पंजाबी नृत्य,राजस्थानी नृत्य, कोळी नृत्य, गोंडी नृत्य, तामिळ नृत्य यासारख्या सर्व भाषिक नृत्याचा समावेश होता. कार्यक्रमाची सुरुवात ‘आयो रे, शुभ दिन आयो’ या स्वागत गीताने करण्यात आली. यानंतर उदे ग अंबे उदे, श्री गणेशाय टिपरी नृत्य, कोई मिल गया, परदेशी गीत, देश रंगीला रंगीला,अप्सरा आली, पंजाबी नृत्य,कोळी नृत्य यासारख्या गाण्यावर नृत्य करून विद्यार्थ्यांनी आनंद घेतला.
तसेच *हरियाणा की छोरी* या नृत्यातून समाजाला बेटी पढाओ, सक्षम बनाओ हा संदेश देत मन मोहुन टाकले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नाझनीन खान मॅडम यांनी केले.या सांस्कृतिक कार्यक्रमासाठी सर्व विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते. तसेच सर्व शिक्षक व शिक्षकतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.



