क्राईम न्युजगुन्हेग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्रसन्मान कर्तव्याचा

मुसळधार पावसामुळे ब्रम्हपुरी येथील अनेक रस्ते पाण्याखाली

अनेक वार्ड जलमय नगर परिषदेचे दुर्लक्ष ; नियोजन शुन्य कारभार, नाली सफाई नकेल्याने उद्भवली परिस्थिती

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदू गुद्देवार

ब्रम्हपुरी :- ब्रम्हपुरी येथल नगर परिषद मध्ये एकहाती सत्ता असून मागील तीन चार दिवसांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे ब्रम्हपुरी येथील अनेक वार्डात पुरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे.पावसाचे पाणी गावातील अनेक नागरिकांच्या घरात शिरले आहे. पावसामुळे ब्रम्हपुरी येथील अनेक रस्ते पाण्याखाली आले आहेत. गेल्या दोन दिवसांपासून पावसाने थैमान घातले आहे.

कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे शेष नगर, विद्या नगर, रविदास चौक, प्रिय दर्शनी इंदिरा गांधी चौक,पटेल नगर, डॉ.गणवीर हॉस्पिटल आदी भागातील रस्ते जलमय झाले आहेत. नगर परिषदच्या नियोजन विभागाच्या ढिसाळ नियोजनामुळे दर वर्षी ही परिस्थिती निर्माण होत असून ब्रम्हपुरी येथील जनतेला नाहक त्रास सहन करावा लागत आहे. वॉर्डातील लोक प्रतिनिधी फक्त निवडणुकी पुरता वार्डा कडे लक्ष देत असून आता मात्र बघ्याची भुमिका घेताना दिसत आहेत.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये