ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

बाकली नदी पात्रातुन अवैध वाळु उत्खनन करून वाळु वाहतुक करणाऱ्याविरूध्द कारवाई

एकूण 8 लाख 59 हजार मुद्देमाल जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

सविस्तर याप्रमाणे आहे की, आर्वी तालुक्यातील वाळु घाटातुन चोरटया मार्गाने मोठ्या प्रमाणात गौण खनिजाचे अवैध्यरित्या उत्खनन करून वाळची अवैध्य वाहतुक होत असल्याने व हि वाळु दुप्पट तिप्पट किमतीने विकुन शासनाचा महसुल बुडवुन सर्वसामान्याची लुट करीत आहेत अशा माहीतीवरून मा. पोलीस अधीक्षक नूरूल हसन सा. वर्धा यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांना गौण खनिजाचे अवैध्य उत्खनन आणि अध्य वाळु वाहुकीला आळा घालण्याकरीता अधिनस्त अधिकारी व अमलदार यांना निर्देश दिले.

यावरून स्थानिक गुन्हे शाखा वर्धा द्वारे दिनांक 23.12.2023 रोजी आर्वी तालुक्यातील बाकली नदी पात्रातुन अवैधरित्या वाळु उत्खनन करून वाळ वाहतुक करणारा एक ट्रॅक्टर जळगाव बेलोरा गावाकडे येत असताना पकडुन टॅक्टर चालक नामे सचिन तुळशिराम ठाकरे, वय 33 वर्ष, रा. जळगाव (बेलोरा) व ट्रॅक्टर मालक अक्षय पोटे, रा. जळगाव (बेलोरा) यांचेविरुध्द पो.स्टे. तळेगाव शा.प. येथे गुन्हा नोंद करून ट्रॅक्टर चालक याचे ताब्यातुन एक होलेन्ड 5500 कपंनीचा टॅक्टर क्र. एम.एच. 32-पि-3451 व बिना कमांकाची ट्राली ज्यामध्ये एक ब्रास काळी रेती असा जु.कि. 8,59,000/- रू.चा मुददेमाल जप्त करण्यात आला.

सदरची कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक नूरूल हसन, मा. अपर पोलीस अधीक्षक डॉ. सागर कवडे, पोलीस निरीक्षक संजय गायकवाड, स्थानिक गुन्हे शाखा वर्धा यांचे ww निर्देशानुसार स.पो.नि. संतोष दरेकर, पोलीस अमलदार मनोज धात्रक, संजय बोगा, विनोद कापसे, अभिषेक नाईक सर्व नेमणुक स्थानिक गुन्हे शाखा वर्धा यांनी कली

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये