जिल्ह्यात विदर्भ व मराठवाडा दुग्ध विकास प्रकल्प टप्पा 2 कार्यान्वित होणार

चांदा ब्लास्ट
महाराष्ट्र शासनाने विदर्भ व मराठवाड्यातील 19 जिल्ह्यांमध्ये सन 2024-25 ते 2028-29 या कालावधीत दुग्धविकास प्रकल्प टप्पा दोन राबवण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकल्पामध्ये चंद्रपूर जिल्ह्याचा समावेश असून ग्रामीण भागातील पशुपालकांच्या आर्थिक उन्नतीसाठी तसेच चंद्रपूर जिल्ह्याचा एकंदरीत दुध उत्पादन वाढण्याच्या दृष्टीने विविध प्रकारच्या योजना जिल्ह्यात राबविण्यात येणार आहेत.
यात 1) 50 टक्के अनुदानावर उच्च दूध उत्पादन क्षमता असलेली एक गाय किंवा म्हैस वाटप 2) 75 टक्के अनुदानावर उच्च दूध उत्पादन क्षमता असलेल्या प्रत्यारोपण केलेली गाभण कालवड वाटप 3) 25 टक्के अनुदानावर प्रजनन पूरक खाद्य पुरवठा 3) 25 टक्के अनुदानावर फैट व एसएमएस वर्धक खाद्य पुरवठा 5) 50 टक्के अनुदानावर कडबा कुट्टी यंत्र वाटप 6) 100 टक्के अनुदानावर बहुवार्षिक चारा पिके व ठोंबेवाटप 7) 3 रुपये प्रती किलो अनुदानावर मुरघास पुरवठा.
तरी सदर योजनांचा लाभ घेण्याकरिता जास्तीत जास्त पशुपालकांनी www.vimddp.com या संकेतस्थळावर भेट देऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावे. सदर अर्ज भरण्याचा कालावधी वर्षभर व २४ तास खुले असणार आहे. पशुपालक आपल्या घरून किवा ग्राम पंचायत किंवा दूध संकलन केंद्रावरून ऑनलाइन पध्दतीने अर्ज करू शकतील.
अर्ज करण्याकरिता आवश्यक कागदपत्रे : 1) अर्जदाराचे आधारकार्ड २) भ्रमणध्वनी क्रमांक, ३) राशन कार्ड, 4) 7/12उत्तारा, 5) बँकपासबुक, 6) कुटुंबातील इतर सदस्यांचे आधारकार्डचे क्रमांक, 8) दुधाळ जनावरांचे बिल्ला क्रमांक लागणार आहेत.
तसेच योजना संबंधी अधिक माहिती करिता जवळच्या पशुवैद्यकीय दवाखाना किंवा दुध संकलन केंद्र किंवा डॉ.जिशांत नंदेश्वर जिल्हा प्रकल्प अधिकारी चंद्रपूर यांना 9158869208 या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क करावा, असे डॉ. ह. सो. वरठी, जिल्हा उपायुक्त पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय चंद्रपूर यांनी कळविले आहे..



