निवडणूक निरीक्षक साबळे यांनी देऊळगाव राजा येथे घेतला आढावा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
आगामी नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या पारदर्शक, शांततापूर्ण आणि सुव्यवस्थित अंमलबजावणीसाठी आज निवडणूक निरीक्षक श्री. जी. पी. साबळे, जिल्हा उपनिबंधक (अकोला) यांनी देऊळगाव राजा येथे भेट देऊन निवडणूक तयारीचा आढावा घेतला.
या भेटीदरम्यान श्री. सुरेश थोरात — निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती सुप्रीया चव्हाण — सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा मुख्याधिकारी, नगरपरिषद देऊळगाव राजा श्रीमती वैशाली डोगरजाळ — अतिरिक्त सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार, देऊळगाव राजा उपस्थित होत्या.
निरीक्षकांनी नामनिर्देशन व छाननी व्यवस्था स्ट्रॉंग रूम, साहित्य वितरण केंद्र व सुरक्षा उपाययोजना प्रशिक्षण हॉल व प्रशिक्षण कार्यक्रम मतदान केंद्रांची सुविधा व मूलभूत पायाभूत व्यवस्था मतदार याद्या, तांत्रिक सुविधा व समन्वय प्रक्रियाची पाहणी केली
श्री. साबळे यांनी निवडणूक प्रक्रिया अधिक प्रभावी, नियमबद्ध व पारदर्शक व्हावी यासाठी आवश्यक मार्गदर्शन केले. दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक व सर्वसामान्य मतदारांना सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यावर विशेष भर देण्यात आला.
आढावा बैठकीत निवडणुकीच्या तयारीबाबत समाधान व्यक्त करण्यात आले असून काही सूक्ष्म बाबी सुधारण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देण्यात आल्या.



