ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त जेष्ठ नागरिकांचा अमृत महोत्सव

ज्येष्ठ नागरिक संघटना भद्रावतीची नवीन कार्यकारणी गठित : अध्यक्ष पदी वसंतराव वऱ्हाटे तर सचिव पदी मोहन पवार यांची नियुक्ती

चांदा ब्लास्ट

       ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त ज्येष्ठ नागरिक दिन समारोह तथा वयाची 75 वर्षे पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांचा अमृत महोत्सवी सत्कार व समारोह ज्येष्ठ नागरिक भवन भद्रावती इथे नुकताच पार पडला.

           या कार्यक्रमाचे उद्घाटन विजय चंदावार जे. ना. प्रा. वि. गडचिरोली यांनी केले तर या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी मोहनदास देशमुख अध्यक्ष ज्येष्ठ नागरिक संघटना भद्रावती हे होते. या कार्यक्रमाचे विशेष मार्गदर्शन रमेश ददगाल योग गुरु पतंजली योग साधना चंद्रपूर यांनी केले असून कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी योगेश पारधी ठाणेदार भद्रावती व विशाखा शेळके मुख्याधिकारी नगरपरिषद भद्रावती या उपस्थित होत्या.

     यावेळी ज्येष्ठ नागरिक संघटनेची नवनियुक्त कार्यकारणी गठीत करण्यात आली असून अध्यक्ष वसंतराव गो. व-हाटे, सचिव मोहन पवार, कोषाध्यक्ष मनोहर साळवे, उपाध्यक्ष राजेंद्र पाटील, सहसचिव आनंदराव रा. कुटेमाटे, मार्गदर्शक काशीराम मनगटे, मोहनदास देशमुख, आश्रयदाता अनिल धानोरकर यांची नियुक्ति करण्यात आली.

         यावेळी सदस्य शकुंतला कोल्हे, प्रमिला डाहुले, शेषराव भोयर, दिलीप ताटेवार, गोपाळ ठेंगणे व दत्तात्रेय गुंडावार व असंख्य जेष्ठ नागरिक उपस्थित होते.

   या नवनियुक्त कार्यकारणीचे सर्वत्र अभिनंदन होत असुन शुभेच्छाचा वर्षाव होत आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये