दारूबंदी गावात अवैध दारू महापूर

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रशांत रणदिवे
बल्लारपूर तालुक्यातील विसापूर येथील ग्रामपंचायत नि व्यसन मुक्त गावं तुकडोजी महाराजांच्या प्रेरणा घेऊन येथील ग्रामपंचायत सदस्य व सरपंच यांनी मागिल अनेक वर्षांपासून ठराव घेऊन गावात दारू बंदी करण्यात आली. परंतु येथील गावात गल्लोगल्ली दारू भट्टी सुरू असून याकडे पोलीस विभागाचे अभय दिसून येत आहे.
नामवंत चौक महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, पुतळ्या समोर रेल्वे फाटक जवळ पान सेंटर येथे खुले आम अवैध दारू विक्री सुरू आहे, मा पोलिस निरीक्षक यांनी बल्लारपूर शहरात रुजु झाल्यानंतर अवैध धंद्या वर बडगा उभारला असून सुद्धा विसापूर येथे भर चौकात अवैध दारू भट्टी सुरू आहे. यात येथिल पोलिसांचे अभय असल्याचे दिसून येत आहे. मा. पोलिस निरीक्षक साहेब या अवैध दारू तस्करावर कारवाई करणार का? असा यक्ष प्रश्न येथील नागरिक व ग्रामपंचायत सदस्य करीत आहेत.