धानोरा पुलाजवळ गोवंशाची अवैध वाहतूक पकडली
तीन आरोपी ताब्यात., 5.60 लाखांचा मुद्देमाल जप्त

चांदा ब्लास्ट
घुग्घुस, चंद्रपूर : दिनांक 14 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी सुमारे 8:30 वाजता घुग्घुस पोलिसांना गुप्त बातमीदारांकडून माहिती मिळाली की पिपरी–धानोरा मार्गे गडचांदूरकडे एका पिकअप वाहनातून गोवंशाची अवैधरित्या वाहतूक करण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी तत्काळ धानोरा पुलाजवळ नाकाबंदी केली.
नाकाबंदी दरम्यान पिकअप क्रमांक MH 49 AT 0360 हे वाहन थांबविण्यात आले. तपासणीअंती वाहनात 13 गायी आखूड दोरखंडाने बांधलेल्या अवस्थेत, वाहनाच्या क्षमतेपेक्षा अधिक प्रमाणात आणि कत्तलीच्या उद्देशाने वाहतूक केल्या जात असल्याचे आढळले.
पोलिसांनी तत्काळ कारवाई करत तीन आरोपींना — रहिवासी बल्लारशाह, जिल्हा चंद्रपूर — यांना ताब्यात घेतले. आरोपींकडून एकूण ₹5,60,000 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या प्रकरणी घुग्घुस पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 202/2025 अंतर्गत कलम 5A(1), 9, 11 महाराष्ट्र पशू संरक्षण अधिनियम 1976, तसेच प्राणी क्रूरता प्रतिबंधक अधिनियम 1960 चे कलम 11(1)(g), 11(1)(d), 11(1)(c), 11(1)(j), भा.दं.वि. कलम 325 आणि मोटार वाहन कायदा कलम 177 अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
सदरची कारवाई पोलीस निरीक्षक प्रकाश राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि. सचिन तायवाडे, पो.उप.नि. गणेश अनभुले, सहा. फौजदार विनोद लोखंडे, पो.हवा. अनिल बैठा, पो.अंमलदार सचिन वासाडे व म.पो.हवा. प्रणाली जांभूळकर यांनी केली.