सामाजिक उपक्रमातून शिंदेचा वाढदिवस! विदर्भातील दिग्गजांची उपस्थिती!

चांदा ब्लास्ट
नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी संकटात आहे. अशात चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष मा. रवींद्र शिंदे यांनी आपला वाढदिवस जल्लोषात साजरा न करता, लोकसेवेचा निर्धार केला.
विविध सामाजिक उपक्रम राबवत, लोकसेवा सोहळ्याला माजी केंद्रीय मंत्री व राष्ट्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष मा. हंसराजजी अहिर, आमदार कीर्तीकुमार भांगडिया, किशोरजी जोरगेवार, देवरावजी भोंगळे, बँकेचे उपाध्यक्ष संजयजी डोंगरे, विधानसभा प्रमुख डॉ. रमेशजी राजुरकर, माजी नगराध्यक्ष अनिलजी धानोरकर व युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष रघुवीर अहिरांसारखे दिग्गज उपस्थित होते.
आदर्श संस्थेमार्फत समाजोपयोगी उपक्रम
मा. रवींद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत आदर्श संस्था व आदर्श कृषी केंद्राच्या माध्यमातून आदर्श शेतकरी बचत गटाला ट्रॅक्टर देण्यात आला.
स्वर्गीय श्रीनिवास शिंदे मेमोरिबल रवींद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्ट चंद्रपूर यांच्या वतीने आयोजित संस्थापक विश्वस्त तथा चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँक सहकारी बँक चंद्रपूरचे अध्यक्ष रवींद्र शिंदे यांचे वाढदिवसानिमित्त खालील प्रमाणे गरजू नागरिकांना मदत करण्यात आली.
विदेही सद्गुरु जगन्नाथ महाराज जनजागृती व प्रबोधन कार्य
1. डोळ्यांचा उपचारासाठी मदत एश्वर्य अशोक पाझारे
2. अपंगत्वाच्या उपचारासाठी मदत शंकर शामराव देवतळे, मारोती गानफाडे
3. पशु नुकसान- शंकर भाऊराव मत्ते, तुषार रमेशराव इंगोले, रमेश जगन्नाथ उरकांदे, विजय वामनराव पुसदेकर
4. घरातील कर्ता दगावल्यामुळे आर्थिक संकट बेबी बापुराव वडाळकर, चंद्रकला महेंद्र फुलझले
5. सामान्य आर्थिक सहाय्यः हनुमान रामकृष्ण काळे, अर्थना अजय महाकुलकर, आम्रपाली मनोज गाठले, संतोष विठ्ठल बावणे
श्रद्धेय बाबा आमटे आरोग्य अभियान
1. कर्करोगग्रस्तांना उपचारासाठी मदत परमेश्वर मारोती चौधरी, संजय रामदास तडस, दिगांबर बापुराव परचाके, पांडु मारोती नवले, राजू शंकर पचारे, राजेंद्रकुमार गंगाप्रसाद केवट, श्रीकृष्ण पांडुरंग निबर्ड, रमेश नध्धुजी चिंचोलकर, नाजिमन इकबाल शेख, मंगला अनिल डाखोरे
2. शस्त्रक्रियेसाठी मदतः- राजकुमार नत्थुजी रडके, पांडुरंग भेंडारे,
3. सामान्य उपचारासाठी मदतः पवन सुधाकर ऐकरे, मालन केशव दरेकर, धर्मा रामचंद्र सिडाम
4. किडनी व अन्य रोगासाठी आर्थिक मदतः- वामन काटकर
“डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम विद्यार्थी कल्याण योजना
1. शैक्षणिक मदत:- कितीर रामदास पांडे, स्वाती सुधीर निखाडे
2. लॅपटॉप वाटप गायत्री प्रदीप पिंपळकर
स्व. सिंधुताई सापकाळ शैक्षणिक पाल्य दत्तक योजना
1. शैक्षणिक दत्तक: गौरी संदीप वाघाडे, खेहल दिनेश बगडे, आस्था विलास नन्नावरे, नम्रता राहुल चौधरी, यश विनायक खैरे, आरोही विनायक खैरे, रदर निलेश उपरे, वेदांत दीपक पिंपळकर, ओम रोशन माहूरे, अवन्या मलखनीसिंह सेंगर, रोशन काशीनाथ कामटकर, चैतन्य रविंद्र कामटकर, शाश्वती शंकर चट्टे, चेतन गजानन भोस्कर, आस्मा गौसखाँ पठान, ओम प्रशांत आत्माराम, शावीर लक्ष्मीकांत मांडवकर, सोनू वामन कडुकर, मोनू वामन क़डुकर, आदित्य संतोष बावणे, आदिती संतोष बावणे, मिताली मनोज गाठले, मनाली मनोज गाठले
सामाजिक बांधिलकीचा वारसा पुढे नेणारा नेता
शिंदे समाजोपयोगी कार्यांसाठी प्रसिद्ध आहेत. कोविड काळातही त्यांनी जनतेला मोठ्या प्रमाणावर मदत केली. राज्यातील शेतकरी आणि सामान्य नागरिकांप्रती त्यांची बांधिलकी पुन्हा एकदा या उपक्रमातून अधोरेखित झाली आहे.
“समाजसेवा हीच खरी पूजा आहे. बाबा आमटे यांच्या कार्याची प्रेरणा घेऊन मी समाजासाठी कार्य करत राहीन, असे मा. शिंदे यांनी या प्रसंगी सांगितले.