अपघात टाळण्यासाठी उपायोजना पोलीस विभाग व इतर संबंधित विभाग यांची संयुक्त बैठक

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
दि. 14/10/25 रोजी 11/00 वा पोलीस अधीक्षक कार्यालय वर्धा येथे संयुक्त बैठकीमध्ये प्रादेशिक परिवहन अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग अधिकारी, समृद्धी हायवे अधिकारी, नॅशनल हायवे अधिकारी राज्य मार्ग अधिकारी, पोलीस अधीक्षक अनुराग जैन सर, अप्पर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे सर, वाहतूक नियंत्रण शाखा वर्धा सर्व एसडीपीओ अधिकारी, प्रभारी पोलीस स्टेशन अधिकारी, यांच्या संयुक्त बैठकीत आज पोलीस अधीक्षक सर श्री अनुराग जैन सर यांनी रोडवरील सर्व प्रकारचे अपघात कमी व्हावे याकरिता योग्य त्या ठिकाणी स्पीड ब्रेकर, सूचना फलक लावण्यात यावे, जास्तीत जास्त हेल्मेट चा वापर करावा त्यासाठी सर्वांनी जनजागृती करावि हेम्लेट वापर सक्ती करावे, दारू पिऊन गाडी चालू नये सतत चालकांची तपासनि करण्यात यावी, समृद्धीवर योग्य त्या ठिकाणी सूचना फलक माहिती फलक लावावे, तसेच ज्या रोडवरती रोड बांधण्याचे काम सुरू आहे ते काम ताबडतोब पूर्ण व्हावे. खराब रस्ते ही लवकर दुरुस्ती करावे, योग्य त्या ठिकाणी अंतरा अंतरावर वेगमर्यादेचे बोर्ड लावावे अशा महत्त्वपूर्ण सूचना दिल्या. मोटर वाहन कायद्यान्वये संयुक्त मोहीम राबवून केसेस करण्याबाबतही सूचना देण्यात आले. अपघात होणार नाही याची सर्वांनी दक्षता घ्यावी.
शाळेतील विद्यार्थी तरुण मुले यांच्या मध्ये ही जणजागृती करावी, रोडवर जेथे अपघात प्रवन स्थळ आहेत तेथे तसे सूचना फलक बांधकाम विभाग यांनी लावावे, गाव, शाळा, चौरस्ता असेल तेथे स्पीड ब्रेकर योग्य ठिकाणी टाकावेत, अपघातात जखमी व्यक्तींना लवकर प्रथमपचाराची मदत मिळावी याकरिता सर्वांनी पुढाकार घ्यावे ज्या स्वयंसेवी संघटना जखमी व्यक्तीस दवाखाण्यात पोहचवतील त्यांना शासनाने योग्य बक्षीस सुद्धा जाहीर केलेले आहे त्याचीही जणजागृती सर्वांनी करावे, वर्धा जिल्ह्यात अपघात कमी होणेस सर्व समंबंधित विभाग यांचे आपसात चांगले सुसंवाद असावा याबाबत सखोल चर्चा ही करण्यात आली आजची मिटिंग पोलीस अधीक्षक कार्यालयात 11/00 वाजता सुरु होऊन 12/30 वा संपली
मा. अपर पोलीस अधीक्षक श्री सदाशिव वाघमारे सर यांनी सर्व सहभागी विभाग प्रमुख यांचे ही आभार व्यक्त केले.
पोलीस निरीक्षक वाहतूक शाखा वर्धा