क्राईम न्युजगुन्हेग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

तीन चाकी मालवाहू गाडीसह तीन किलो गांजा जप्त

स्थानिक गुन्हे शाखा वर्धाची कारवाई

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

दिनांक 12.07.2023 रोजी पोलीस स्टेशन हिंगणघाट परीसरात अवैध धंद्यावर कार्यवाही करने करिता स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पेट्रोलिंग करित असतांना मुखबिरद्वारे मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे हिंगणघाट ते सातेफळ रोडवर नाकाबंदी करून 1) मोहम्मद नईम शेख मुनाफ, वय 33 वर्षे, रा. सेंट्रल वार्ड, शिंगरू वाड्याजवळ, हिंगणघाट. जि. वर्धा 2) एक वि.स.बालक यांना ताब्यात घेऊन त्यांचे ताब्यातील तीन चाकी मालवाहू गाडीची झडती घेतली असता तीन किलो गांजा मिळून आला. त्यांचे ताब्यातून 1) मालवाहू गाडी 2) तीन किलो गांजा 3) एक मोबाईल असा एकूण जुमला किंमत 2,26,750/- रुपयेचा माल जप्त करून एन. डी. पी. एस. कायद्यान्वये पोलीस स्टेशन हिंगणघाट येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक नूरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक डॉ. सागर कवडे यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक संजय गायकवाड स्था.गु.शा वर्धा यांचे निर्देशाप्रमाणे पोलीस निरीक्षक कैलास पुंडकर पो. स्टे. हिंगणघाट यांचे प्रत्यक्ष मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक अमोल लगड, पोलीस अंमलदार सचिन इंगोले, प्रमोद पिसे, श्रीकांत खडसे, रामकिसन इप्पर, पवन पन्नासे, नितीन इटकरे सर्व स्थानिक गुन्हे शाखा वर्धा यांनी केली.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये