समर्थ कृषी महाविद्यालयात शस्त्रपूजन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अंतर्गत समर्थ कृषी महाविद्यालय देऊळगाव राजा येथे पारंपारिक उत्साहात शस्त्र पूजन सोहळा साजरा करण्यात आला.
प्राचार्य डॉ.नितीन मेहत्रे यांनी शस्त्र पूजन केले.दशर्याच्या या पावन दिवशी आपल्या जीवनातील साधनं, शस्त्रं व उपकरणांची पूजा करून परिश्रम, शौर्य व विजयाची प्रेरणा घेण्याची परंपरा आहे. कृषी व बागायती विभागातील साधनं जसे – नांगर, कुऱ्हाड, विळा, खुरपी, फवारणी यंत्र, ठिबक सिंचन साधनं, कापणी यंत्र, ट्रॅक्टर, पाणीपुरवठा साधनं, रोपांची लागवड करण्याची उपकरणं इत्यादी हे शेतकऱ्यांचे खरे शस्त्र आहेत.त्यांच्याच बळावर ग्रामीण भारत अन्नदाता बनतो व देशाचा कणा मजबूत राहतो.
आजच्या शस्त्रपूजन सोहळ्यात या सर्व उपकरणांना व ज्ञानाला वंदन करून आपण नवीन उमेदीने कृषी व बागायती क्षेत्रात प्रगती साधू, आत्मनिर्भर बनू व ‘विकसित भारत’ घडवू या संकल्पाने एकत्र आलो आहोत. कार्यक्रमास सर्व प्राध्यापक वृंद, कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.