ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

नागपूर महामार्गावरील खांबाडा येथे चक्काजाम आंदोलन

शेतकरी नेते बच्चू कडू शेतकरी आंदोलनात यांची उपस्थिती

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

पक्षझेंडा बदलणार नाही, पण शेतकऱ्याची लूट थांबली पाहिजे’ ; बच्चू कडूंचा खांबाडा येथे ठोस आवाज

  ओल्या दुष्काळासह शेतकऱ्यांच्या समस्यांकडे सरकार दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप करून शेतकरी नेते बच्चू कडू यांनी चंद्रपूर जिल्ह्यात सरकार विरोधी बंड पुकारले आहे. आज मंगळवारी वरोरा तालुक्यातील खांबाडा येथे झालेल्या शेतकरी आंदोलनाला त्यांनी भेट देऊन चळवळीला चालना दिली आहे.

खांबाडा चौकात शेतकऱ्यांनी चक्काजाम करून मोर्चा नेण्यात आला होता. या आंदोलनादरम्यान ‘सातबारा कोरा झालाच पाहिजे’, ‘बच्चू भाऊ आगे बढो, हम तुम्हारे साथ है’ अशा घोषणा देत शेतकरी सरकारचा निषेध नोंदविला . शेतकरी नेते बच्चू कडू यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन शेतकऱ्यांच्या समस्या ऐकल्यावर शेतकऱ्यांनी त्यांचे आभार मानले.

या आंदोलनात शेतकऱ्यांच्या मुख्य मागणी म्हणून सरसकट कर्जमाफी, ज्या शेतकऱ्यांनी सरसकट विमा काढला आहे. त्या पिकांसाठी सरसकट पीक विमा लागू करावा, शेतमजुरांचे प्रश्न, दिव्यांगांसाठी ६,००० रुपये मासिक मानधन यांचा समावेश आहे. तसेच, कापूस व सोयाबीनसारख्या पिकांसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची सोय करण्याची मागणी किशोर डुकरे यांनी करण्यात आली होती. शेतकऱ्यांनी खराब झालेले सोयाबीनचे पीक हातात घेऊन आंदोलन उभारले होते.

        ‘पक्षझेंडा बदलणार नाही, पण शेतकऱ्याची लूट थांबली पाहिजे’; बच्चू कडूंचा खांबाडा येथे ठोस आवाज

. ‘बाप मेला तरी चालेल, पण पक्षाचा झेंडा बदलणार नाही,’ हा शासनाचा डोलारा शेतकऱ्यांनी समजून घेतला पाहिजे, परंतु शासकीय धोरणे चुकीची आहेत म्हणून शेती व्यवसाय तोट्यात आहे आणि शेतकरी आत्महत्या करत आहेत, असे टिप्पणी शेतकरी नेते बच्चू कडू यांनी खांबाडा येथील शेतकरी आंदोलनात बोलताना केली.

        त्यांनी म्हटले, “आजारपणामुळे घरची जनावरे विकावी लागतात, शेणखताला सबसिडी दिली पाहिजे.” मोदी सरकारवर टीका करताना त्यांनी सांगितले, “आठ वर्षांची लूट केल्यावर जीएसटी कमी केली. अशा परिस्थितीत भारतात नेपाळसारखी स्थिती व्हायला वेळ लागणार नाही.” त्यांनी ‘शेतकऱ्यांची लूट थांबवा’ आणि ‘सातबारा कोरा करा’ या मागण्या पुन्हा ठणकावून मांडल्या.

शेतकऱ्यांना संबोधित करताना बच्चू कडू म्हणाले, “नाव देवा भाऊ पण करणी रावणाची आहे. झेंडा कोणताही असो, कापड मात्र शेतकरीच पिकवतो. सोयाबीन रोपटे उंच वाढलेली असूनही, हंगाम संपल्यावर देखील झाडे शेंगांविना रिकामीच आहेत.

शेतकऱ्यांच्या अशा बऱ्याच प्रश्नांना शेतकरी आंदोलनात वाचा फोडली. या आंदोलनात शेतकऱ्यांचे निवेदन नायब तहसीलदार लोखंडे यांनी स्वीकारले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख नितीन मत्ते एकनाथ शिंदे गट, किशोर डुकरे सामाजिक कार्यकर्ते यांचीही कार्यक्रमात उपस्थिती होती. वर्धा जिल्ह्यातील समुद्र, पूर, हिंगणघाट तालुक्यातील शेतकरीही या आंदोलनात सहभागी झाले होते. हजारो शेतकरी या आंदोलनात उपकस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये