गडचांदूर येथे जनजाती गौरव दिन उत्साहात साजरा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
वनीता महिला मंडळ संचालित अनुदानित आश्रमशाळा गडचांदूर येथे आदिवासी विकास नागपूर व प्रकल्प संचालक कार्यालय आदिवासी विकास प्रकल्प चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने जनजाती गौरव दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
या निमित्ताने आदिवासी पारंपरिक वेशभूषा, चित्रकला, हस्तकला प्रदर्शन, सांस्कृतिक स्पर्धा तसेच आदिवासी थोर नेत्यांचे प्रदर्शन यांचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संस्थापक मा. वसंत चट्टे यांनी भूषविले. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा स्थायी समिती सदस्य व जनजाती सुरक्षा समिती अध्यक्ष मा. भारत आत्राम, शाखा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मा. प्रेमदास मेघाराम, पोलीस ठाणे पाटण येथील पोलीस मदगी, मुख्याध्यापक मा. चंद्रभान वरस्कर, मा. बाळू दरवे तसेच शिक्षक मा. रेपाळे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक गृहशिक्षक मा. चंद्रभान सर यांनी केले. यावेळी मा. भारत आत्राम यांनी आदिवासी समाजाचे देदिप्यमान आणि क्रांतिकारी नेते यांच्या जीवनकार्याचा आढावा घेत विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. देविदास राठोड यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री. अनजय सानबुके यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व कर्मचारी यांनी विशेष प्रयत्न केले.